'आधार'मुळे बिघडणार शिक्षकांचे गणित...रखरखत्या उन्हातही वणवण करण्याची वेळ!  

teacher.jpg
teacher.jpg
Updated on

नाशिक : (कसबे सुकेणे) लॉकडाउनमध्ये शाळांना सुट्टया जरी असल्या तरीही रखरखत्या उन्हातही वणवण करण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांची संचमान्यता आणि समायोजनही होणार आहे. यामुळे राज्यातील गुरुजींना विद्यार्थ्यांचाच आधार मिळणार आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, नाशिक यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड क्रमांकांची माहिती अद्ययावत करण्याचा आदेश सर्व माध्यमिक शाळांना दिला आहे. या आधारमुळेच गुरूजींचे गणित बिघडणार आहे.

संख्यात्मक माहिती पोर्टलवर 

एनआयसीमार्फत सर्व शाळांची संचमान्यता तयार करून जिल्हास्तरावर शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगिनवर दिली आहे. यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावरून सर्व शाळांना संचमान्यता देण्याची कार्यवाही सुरू आहे. सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या आधारकार्डावरील क्रमांक संचमान्यतेसाठी लॉगिन करावे लागणार आहेत. गेल्या वर्षी शासनाने संचमान्यता करण्यास स्थगिती दिली होती. मात्र ही स्थगिती आता उठविली असून, 15 जानेवारी 2020 अन्वये 2019-20 मधील विद्यार्थी माहिती स्टुडंट पोर्टलवर शाळांनी केंद्रप्रमुखांकडे फॉरवर्ड करावी. विद्यार्थ्यांची हीच माहिती आता चालू वर्षी संचमान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसारच शिक्षकांना आता विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करावयाचे असून, अपडेट केलेल्या शाळांची संख्यात्मक माहिती पोर्टलवर दिसणार आहे. 

पंचायत समितीकडून तगादा

ज्या शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती अपलोड केलेली नाही ती लगेच त्या ठिकाणी दिसणार असून, 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये शाळांच्या संचमान्यतेसाठी हीच माहिती विचारात घेतली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदविले जाणार नाही त्या विद्यार्थ्यांना शिक्षक संच मान्यतेसाठी गणले जाणार नाही. त्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थी आधारकार्डधारक असतील याची दक्षता शाळांना घ्यावी लागणार आहे. त्या आधारित पोर्टलवर माहिती भरली जाणार आहे. याच माहितीच्या आधारे शिक्षकांची संख्या ठरवून अतिरिक्त शिक्षकांचेही समायोजन होणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची 100 टक्के आधारकार्ड माहिती अपलोड करणे शाळांवर पर्यायाने शिक्षकांवर बंधनकारक असून, 100 टक्के विद्यार्थ्यांचे आधारकार्ड न भरणाऱ्या शाळांना पंचायत समितीकडून विचारणा होत आहे. त्यामुळे लॉकडाउन असतानाही शिक्षकांना आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक मिळविण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. 

नुसता क्रमांक नको तर कार्डही हवे 

विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी आधार कार्ड क्रमांक देणे आवश्‍यक असले तरी प्रत्यक्षात आधारकार्डवरील नाव जसेच्या तसे न टाकल्यास आधार क्रमांक असूनही विद्यार्थ्यांची माहिती अपडेट होत नाही. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याचे नाव, मधले नाव आणि आडनाव या क्रमाने आधारकार्डवर नाव असेल आणि ते ऑनलाईन अपडेट करताना आधी आडनाव, विद्यार्थ्याचे नाव आणि पालकाचे नाव असा त्याचा क्रम बदलला तर ते अपडेट होत नाही. यामुळे शिक्षकांना थेट विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची प्रत घेऊनच त्यावरील माहिती ऑनलाईन भरावी लागत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com