
नाशिक / कंधाणे : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर शाळा बंद आहेत. मात्र कंधाणे परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन-ऑफलाइन विविध माध्यमांतून शिक्षण दिले जात आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतमजुरांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी शिक्षक शेताच्या बांधापर्यंत पोचत आहेत.
बांधावर जाऊन शिक्षकांकडून अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न
कंधाणे केंद्रातील बहुतांश शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून, शेतमजुरी करणाऱ्या पालकांकडे आर्थिक परिस्थितीमुळे मोबाईल किंवा इतर साधन उपलब्ध नसल्याने शिक्षक प्रत्यक्ष भेटीतून मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांच्या घरी ओट्यावर किंवा झाडांखाली मास्क व सॅनिटाइझरचा वापर करून सामाजिक अंतरावर बैठकव्यवस्था करून आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच आई-वडिलांसोबत कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या शेतमजुरांच्या पाल्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षक शेताच्या बांधापर्यंत पोचत आहेत.
विद्यार्थी व पालकांकडून उत्तम प्रतिसाद
गावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गल्ली मित्र बनवून त्यांच्यामार्फत अभ्यासासाठी शैक्षणिक साहित्य पुरविले जात आहे. तसेच गावातील भजनी मंडळाच्या लाउडस्पीकरच्या सहाय्याने कविता, पाढे व शैक्षणिक ऑडिओ क्लिप ऐकविल्या जात असून, अशा विविध उपक्रमांतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणप्रक्रियेला परिसरातील विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद व पालकांकडून सहकार्य मिळताना दिसत आहे.
अशिक्षित व परिस्थितीने गरीब असणाऱ्या पालकांकडे अँड्राइड मोबाईल नसल्याने प्रत्यक्ष भेटीद्वारे केलेले मार्गदर्शन व दिला जाणारा गृहपाठ तपासणी करून दिले जाणारे शिक्षण प्रभावी ठरते आहे. - कारभारी जगदाळे, प्रा. शिक्षक चौंधाणे
ऑनलाइन शिक्षणासाठी राज्यस्तरावर अनेक तंत्रस्नेही शिक्षक व विविध संस्था कार्यरत असून, त्यांच्यामार्फत अभ्यासासाठी शैक्षणिक मेसेज, फायली व्हॉट्सॲपद्वारे शिक्षक, विद्यार्थी व पालकांपर्यंत पोचविले जात असून, शिक्षकांना झूम, गुगल मीटद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. -एम. एस. भामरे, केंद्रप्रमुख, कंधाणे
संपादन - ज्योती देवरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.