Nashik News: जळीत कुटुंबाच्या मदतीला धावले तहसीलदार अन्‌ तलाठी संघटना; आगीत खंडागळे कुटुंबाचा संसार भस्मसात

Tehsildar Aba Mahajan, Divisional Magistrate Jayashree Shete etc. while visiting and inspecting the incident site.
Tehsildar Aba Mahajan, Divisional Magistrate Jayashree Shete etc. while visiting and inspecting the incident site.esakal

येवला : सर्वसामान्य कुटुंब जळीताच्या घटनेमुळे उघड्यावर पडल्याने महसूल अधिकारी कुटुंबाच्या मदतीला धावून आले.

संसार आगीत भस्मसात झाल्याने तहसीलदार आबा महाजन यांनी एक महिन्याचा किराणा व इतर साहित्य, तर तलाठी संघटनेने १५ हजार रुपये रोख देत खडांगळे कुटुंबाला मदतीचा हात दिला. (Tehsildar and Talathi organization rushed to help burnt family life of Khandagale family destroyed in fire Nashik News)

आडगाव चोथवा परिसरातील येवला-कोपरगाव मार्गावरील लक्कडकोट पैठणी या शोरूममध्ये वॉचमन म्हणून नोकरीला असलेल्या बाळू दामू खंडागळे यांच्या घराला आग लागली. शोरूमच्या लगतच पत्राचे शेड असणाऱ्या दोन खोल्यांमध्ये कुटुंबासह खंडागळे राहत होते.

सोमवारी (ता. ४) दुपारी चारच्या सुमारास सर्व कुटंब कामावर होते. बाळू खंडागळे यांची सून व लहान बाळ घरात असताना, अचानक विजेच्या शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली. सुदैवाने त्यांची सून बाळाला घेऊन वेळेत घराबाहेर आली.

Tehsildar Aba Mahajan, Divisional Magistrate Jayashree Shete etc. while visiting and inspecting the incident site.
Nashik Fire Accident: धावत्या चारचाकीने घेतला पेट; भोळे कुटुंबीय थोडक्यात बचावले

मात्र, आगीत सर्व संसारोपयोगी साहित्य खाक झाले. तहसीलदार आबा महाजन, मंडलाधिकारी जयश्री शेटे, चेतन चंदावार, गायके, तलाठी दत्तात्रय गिरी यांनी तत्काळ भेट देऊन घटनेची दखल घेतली व पंचनामा केला.

कुटुंबाला धीर देत तलाठी संघटनेतर्फे रोख १५ हजारांची मदत दिली. तहसीलदार महाजन यांनी एक महिन्याचा किराणा व इतर साहित्य तत्काळ दिले. तहसीलदार महाजन आणि तलाठी संघटनेने मदतीचा हात दिल्याने परिसरात त्यांचे कौतुक केले जात आहे.

Tehsildar Aba Mahajan, Divisional Magistrate Jayashree Shete etc. while visiting and inspecting the incident site.
Nashik Fire Accident : शॉर्टसर्किटने तोरणा नगरच्या घराला आग; सर्व साहित्य जळाले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com