cidco Torna Nagar house fire due to short circuit nashik news
cidco Torna Nagar house fire due to short circuit nashik newsesakal

Nashik Fire Accident : शॉर्टसर्किटने तोरणा नगरच्या घराला आग; सर्व साहित्य जळाले

Nashik Fire Accident : सिडकोतील तोरणा नगर परिसरातील उर्दू हायस्कूलच्या मागे असलेल्या चौथ्याशी स्कीम मधील एका घराला शनिवारी दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी आग लागल्याने घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.(cidco Torna Nagar house fire due to short circuit nashik news)

सुदैवाने घरातील मंडळी बाहेर असल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. घरामध्ये पती-पत्नी, आई व दोन मुले असा परिवार आहे. घरातील मंडळी भाजी घेण्यासाठी बाहेर पडले होते.

सदर खबर अग्निशमन दलाला कळतच त्यांनी अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी आणला, परंतु गल्लीबोळातून घटनास्थळी पोहोचण्यास नेहमीप्रमाणे अडचण निर्माण झाली. अवघ्या पंधरा मिनिटात अग्निशमनदलाने येथील आग विझवून आटोक्यात आणली. परंतु घरातील टीव्ही, फर्निचर, कपाट गादी आदी साहित्य जळून भस्मसात झाले.

cidco Torna Nagar house fire due to short circuit nashik news
Nashik Fire Accident : अर्धवट फटाक्यांची दारू फोडताना 5 वर्षांचा मुलगा भाजला

यावेळी सिडको अग्निशमन दलाचे लीडिंग फायरमन ए.ए. पटेल, वाहन चालक मल्हारी अहिरे, एम. पी. भालेराव, श्री. आम्ले, श्री. वझरे, श्री. जोशी, श्री. शिलावट आदी कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी मेहनत घेतली. सदर घराचे योगेश खैरनार हे भाडेकरू असल्याचे समजते.

cidco Torna Nagar house fire due to short circuit nashik news
Nashik Fire Accident: धावत्या चारचाकीने घेतला पेट; भोळे कुटुंबीय थोडक्यात बचावले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com