Winter Weather : रात्री थंडी, दिवसा कडक ऊन पारा वाढल्याने उन्हाळ्याची चाहुल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

heat

Winter Weather : रात्री थंडी, दिवसा कडक ऊन पारा वाढल्याने उन्हाळ्याची चाहुल!

नाशिक : फेब्रुवारी महिन्यातील अवघे दहा दिवस संपलेले असताना आत्तापासूनच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. जिल्ह्याचा पारा ३४. ७ अंश सेल्सिअसपर्यंत पोचल्याने दुपारी कडक तर, रात्री थंडी जाणवते.

उन्हापासून (Summer) बचाव करण्यासाठी तरुणीकडून स्कार्प, स्टॉल, रुमाल व टोप्यांची मागणी अचानकपणे वाढली आहे. (temperature fluctuations during day night at mid feb nashik news)

मार्च महिन्यानंतर उन्हाची तीव्रता जाणवते. परंतु, यंदा फेब्रुवारीत विचित्र असे वातावरण नाशिककरांना अनुभवायला मिळत आहे. रात्री थंडी जाणवत असल्याने स्वेटर घालावे लागते. तर, दुपारी कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे दिसून येते.

गर्दीचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महात्मा गांधी रोड, मेनरोडवर दुपारी कमी वर्दळ दिसून येते. एरवी चारचाकी वाहन येथे घेऊन जाणे म्हणजे डोकेदुखी आहे. पण दुपारी अगदी सहजपणे चारचाकी गाड्या फिरताना दिसून आल्या.

उन्हापासून बचाव करण्यासाठी महिलांनी आपला मोर्चा आता स्कार्प आणि स्टॉलकडे वळवल्यामुळे विक्रेत्यांचे प्रमाण वाढले आहे. नेहमीच्या दुकानांसह रस्त्याच्या कडेला बसून हातविक्री करणाऱ्या विक्रेते स्वत: दरात विक्री करत असल्याचे दिसून येते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

असे आहेत दर

कॉटन स्कार्प : १३० रुपयांपासून

विविध रंगी स्टॉल : २३० रुपयांपासून

सफेद हात रुमाल सहा : १८० रुपयांना

टोपी : ५० रुपयांपासून पुढे

"उन्हाळ्याची चाहूल लागताच महिला स्कार्प व स्टॉलची खरेदी करतात. यंदा रंगबेरंगी स्कार्प, स्टॉल उपलब्ध आहेत. त्यात कॉटन कापडांना जास्त मागणी असते. सफेद रंगापेक्षा विविध रंगी स्कार्प व स्टॉलला अधिक मागणी आहे." - रूपेश वाणी, विक्रेते, नाशिक