नाशिकचे तापमान यंदा एप्रिलमध्येच चाळीशीपार..!

temperature of Nashik crossed 40 degrees in April this year
temperature of Nashik crossed 40 degrees in April this yearesakal

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून उन्‍हाचा तडाखा जाणवत असताना सोमवारी (ता. ४) यंदाच्‍या हंगामातील उच्चांकी कमाल तापमानाची (Highest Temperature) नोंद झालेली आहे. नाशिकचे कमाल तापमान ४०.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून, यंदा एप्रिलमध्येच चाळीस अंश सेल्सिअसचा (Celsius) टप्‍पा ओलांडला गेला आहे.

मार्च महिन्‍याच्‍या सुरवातीपासून उन्‍हाळ्याच्‍या झळा जाणवू लागल्‍या आहेत. अशात दिवसा सूर्याच्‍या तप्त किरणांमुळे शहर- परिसरात शुकशुकाट बघायला मिळतो आहे. उन्‍हाळ्यामुळे जनजीवन प्रभावित होत आहे. अनेकांकडून बचावात्‍मक उपाय म्‍हणून टोपी, उपरणे आदी वस्‍तूंचा आधार घेतला जातो आहे. अशात सोमवारी नाशिकच्‍या कमाल तापमानाने यंदाच्‍या हंगामातील उच्चांक गाठला. नाशिकचे कमाल तापमान ४०. २ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे, तर किमान तापमान १९. ६ अंश सेल्सिअस असे नोंदविले गेले आहे. येत्‍या काही दिवसांत पाऱ्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्‍यक्‍त केला जातो आहे. त्यामुळे यंदाच्‍या उन्‍हाळ्यात तप्त उन्‍हाळ्याला नाशिककरांना तोंड द्यावे लागणार आहे.

temperature of Nashik crossed 40 degrees in April this year
हुश…संपले एकदाचे दहावीचे पेपर..!

आठवडाभरातील तापमान असे (अंश सेल्सिअसमध्ये)

तारीख किमान कमाल
२९ मार्च २०. ४ ३८. १
३० मार्च १७. ८ ३७. ७
३१ मार्च १५. ९ ३७. ३
१ एप्रिल १५. ४ ३८. ४
२ एप्रिल १६. २ ३८. ७
३ एप्रिल १९. २ ३९. ६
४ एप्रिल १९. ६ ४०. २

temperature of Nashik crossed 40 degrees in April this year
आडगाव शिवार बनलाय मृत्युचा सापळा; 3 महिन्यात आठ अपघाती मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com