esakal | तो बिबट्या कि आणखी काही? चिचोंडीत अज्ञात हिंस्त्र प्राण्याची दहशत
sakal

बोलून बातमी शोधा

chinchodi

चिचोंडीत अज्ञात हिंस्त्र प्राण्याची दहशत; नागरिकांत दहशत

sakal_logo
By
प्रमोद पाटील

चिचोंडी (जि.नाशिक) : चिचोंडी खुर्द येथील ज्ञानेश्वर शिंदे यांचे सात महिन्याचे वासरू काल सायंकाळी अज्ञात हिंस्त्र प्राण्याने मकाच्या शेतात ओढत नेले होते. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तो बिबट्या कि आणखी काही? चिचोंडीत अज्ञात हिंस्त्र प्राण्याची दहशत

चिचोंडी खुर्द येथे सोमवारी (ता.१३) रोजी नेहमीप्रमाणे चरत असलेले वासरू सायंकाळी ज्ञानेश्वर शिंदे आणायला गेले असता ते दिसेना. मात्र काहीतरी मकाच्या पिकात ओढत नेल्याचे फरफट दिसून आली. ही माहिती वन विभागाला कळवली मात्र त्यांच्या सल्ल्याने अंधार असल्याने सध्या मका पिकात जाऊ नका, सकाळी जाऊन पहा असे सांगण्यात आले.. यानंतर आज (ता.१३) सकाळी मका पिकात शिरून बघितले असता अज्ञात हिंस्त्र प्राण्याने वासरावर हल्ला करत ठार केल्याचे दिसून आले.

हेही वाचा: बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा सुरगाणा पोलिसांकडून पर्दाफाश!

गेल्या पंधरा दिवसापासून चिचोंडी परिसरामध्ये कोणत्या ना कोणत्या भागात बिबट्या सदृश्य हिंस्त्र प्राण्याचे दर्शन होत असून या हिंस्त्र प्राण्याने आत्तापर्यंत तीन ते चार पाळीव कुत्रे व एक बकरी व आता वासराचा फडशा पाडला आहे. दरम्यान वन विभागाने या अज्ञात हिंस्त्र प्राण्याला जेरबंद करावे अशी मागणी परिसरातून होत आहे.

हेही वाचा: नाशिक : गोदावरीला पूर; आपत्ती निवारण विभाग अलर्टवर

loading image
go to top