'या' भागात कायमच त्यांची दहशत; अनेकदा गावांमध्ये दंगलसदृश्य परिस्थिती? वाचा काय आहे प्रकार

crime.jpg
crime.jpg
Updated on

नाशिक : (सिन्नर) तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या वर्षभरापासून त्यांची दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण अधिकच तयार झाल्याने या भागातील सामाजिक शांतता, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नदेखील ऐरणीवर येत आहे. वाचा काय आहे प्रकार?

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात ‘टायगर ग्रुप’ची दहशत 

तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या वर्षभरापासून टायगर ग्रुप नावाच्या एका स्वयंघोषित ग्रुपची दहशत निर्माण झाली आहे. सिन्नरच्या पूर्व भागातील सीमेवरील गावांमध्ये, तसेच लगतच्या कोपरगाव, राहता या तालुक्यांमध्ये या ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सक्रिय आहेत. आता ग्रुपमध्ये अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांची उठवत होत असल्याने या भागातील सामाजिक शांतता, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नदेखील ऐरणीवर येत आहे. मागील वर्षभरापासून ग्रुपच्या सभासदांकडून होत असणारे उपद्व्याप जनतेची डोकेदुखी वाढवणारे ठरत आहेत. किरकोळ कारणावरून देखील हातघाईवर येणाऱ्या टायगर ग्रुपच्या सदस्यांमुळे अनेकदा गावांमध्ये दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होऊनही त्याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. 

शस्त्रास्त्रे घेऊन राडा करण्याची नवी संस्कृती

पूर्व भागातील अनेक गावांमध्ये सध्या वाळूच्या चोरट्या व्यवसायाला उधाण आले आहे. या व्यावसायिकांना अथवा त्यांच्या वाहनांना रात्रीच्या वेळी संरक्षण देण्यासाठी अनेकदा टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत घेतली जात आहे. तर काही ठिकाणी हेच कार्यकर्ते वाळूच्या गाड्या अडवून वाळूमाफियांना त्रास देतात, असेही चित्र पहावयास मिळत आहे. ग्रुपमधील एखाद्या सदस्याचे अथवा त्याच्या संपर्कातील कोणाचे भांडण-तंटे झाल्यास ते मिटवण्यासाठी लाकडी दांडे, चॉपर, फायटर यांसारखे शस्त्रास्त्रे घेऊन राडा करण्याची नवी संस्कृती पूर्व भागात उदयास येऊ लागली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com