Shinde Vs Thackeray : म्युनिसिपल कामगार सेनेच्या कार्यालयाचा ताबा ठाकरे गटाकडे; शिंदे गटाला जोरदार धक्का

Police officers removing the seal of the office of Nashik Municipal Employees Workers' Sena on the orders of the High Court.
Shinde Vs Thackeray : म्युनिसिपल कामगार सेनेच्या कार्यालयाचा ताबा ठाकरे गटाकडे; शिंदे गटाला जोरदार धक्का

Shinde Vs Thackeray : राज्यात शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिंदे गटाकडून महापालिका मुख्यालयातील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना युनियनबरोबरच कार्यालयावर मिळवलेला ताबा चांगलाच अंगलट आला.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज कार्यालयाचा ताबा ठाकरे गटाला मिळाला. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष व शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडे कार्यालयाचा ताबा देण्यात आल्याने शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेत मागील वर्षाच्या जून महिन्यात उभी फूट पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांचा गट बाहेर पडला. (Thackeray group get control of Municipal Workers Sena office nashik news)

भारतीय जनता पक्षाबरोबर सत्ता स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाने संघटनात्मक पातळीवर बांधणी सुरू केली.

त्याचाच एक भाग म्हणून नाशिक महापालिकेमध्ये सर्वांत मोठी संघटना असलेल्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेवर दावा केला. त्याचबरोबर कामगार सेनेचे कार्यालयदेखील ताब्यात घेतले. याविरोधात संघटनेचे अध्यक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी संघटनेची सूत्रे हाती घेताना मुख्यालयातील शिवसेनेच्या कार्यालयाची मागणी केली.

परंतु शिंदे गटाकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर श्री. बडगुजर यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यामध्ये २४ ऑक्टोबर २०२२ प्रवीण तिदमे यांच्या विरोधात तक्रार दिली. तणाव वाढू नये म्हणून प्रशासनाने कार्यालय सील केले. प्रशासनाकडून झालेली कारवाई ही एकतर्फी असल्याचा आरोप श्री. बडगुजर यांनी केला होता. कार्यालय सील करण्याच्या कृतीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shinde Vs Thackeray : म्युनिसिपल कामगार सेनेच्या कार्यालयाचा ताबा ठाकरे गटाकडे; शिंदे गटाला जोरदार धक्का
Shinde on Thackeray: "फडणवीसांवर कलंकाचा आरोप करण्याचा अधिकार ठाकरेंना नाही"; CM शिंदेंनी सुनावलं

त्यावर न्यायमूर्ती रेवती ढेरे व न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी २७ जूनला निकाल दिला. त्यात बडगुजर यांची नियुक्ती योग्य ठरविण्यात आली, तर कार्यालय संघटनेकडे सोपविण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, न्यायालयाच्या निकालाच्या आदेशाची प्रत महापालिका प्रशासनाला आज प्राप्त झाली. त्यानुसार सरकारवाडा पोलिसांनी कार्यालयाचे सील काढून मिळकत विभागाकडे दिले.

"पोलिसांच्या दाबावामुळे पालिका प्रशासनाने कार्यालय सील केले होते; परंतु न्यायदेवतेच्या दरबारात आम्हाला न्याय मिळाला. न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी कार्यालयाचा ताबा मिळाला. असाच न्याय आम्हाला चिन्हाच्या बाबतीत देखील मिळेल." - सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)

Shinde Vs Thackeray : म्युनिसिपल कामगार सेनेच्या कार्यालयाचा ताबा ठाकरे गटाकडे; शिंदे गटाला जोरदार धक्का
Eknath Shinde: 'CMOतून तुरुंगातील गुन्हेगारांशी डीलिंग, निवडणुकीआधी काढणार बाहेर'; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com