Nashik News : भगवंताचे अखंड नामस्मरण हाच श्‍वास अन् जीवन

Departure of Varakras to Trimbak Nagar in the wake of Vithunama
Departure of Varakras to Trimbak Nagar in the wake of Vithunamaesakal
Updated on

नाशिक : षटतिला एकादशी अर्थात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ यात्रोत्सवाचे औचित्य साधत रविवारी (ता. १५) जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या शेकडो दिंड्यांनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वरकडे प्रस्थान ठेवले. त्या वेळी विविध दिंड्यांमधील वारकऱ्यांशी संवाद साधला असता ‘भगवंताचे अखंड नामस्मरण हाच वारकऱ्यांचा श्‍वास अन् विश्‍वास’ असल्याचे त्यांनी सांगितले.

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पौषवारी अर्थात निवृत्तीनाथ यात्रोत्सव बुधवारी (ता. १८) त्र्यंबक नगरीत होत आहे. वारीच्या आदल्या दिवसापासून म्हणजे १७ तारखेपासून शनिवारपर्यंत (ता.२१) देवस्थानतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (The constant remembrance of God is breath and life Departure of Varakras to Trimbak Nagar in wake of Vithu Nama Nashik News)

Departure of Varakras to Trimbak Nagar in the wake of Vithunama
Nashik News : चंदनपुरी यात्रेत ढोलकीची जादू ओसरली; Electronic खेळणीच्या मागणीने विक्रीवर परिणाम

त्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने दिंड्या त्र्यंबक नगरीकडे मार्गस्थ झाल्या आहेत. यातील काही दिंड्या नाशिकमध्ये मुक्कामी होत्या. ज्ञानोबा- तुकारामाचा गजर करत निघालेल्या या दिंड्या काही काळासाठी नाशिकमध्ये थांबल्या असता त्यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी भगवंताचे अखंड नामस्मरण हाच आमचा श्‍वास अन् जीवन झाल्याचे सांगितले. डोईवर तुळशीपत्र धारण केलेल्या अनेक महिला वारकऱ्यांनी उरलेल्या आयुष्यातही विठूराया दिंडीत सहभागाचे बळ देवो, अशी प्रार्थना केली.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Departure of Varakras to Trimbak Nagar in the wake of Vithunama
Nashik News : जुन्या मूर्तीचे विसर्जन, नवीन मूर्तीची स्थापना

सर्वच संतांचा घडतो सहवास

वयाच्या बाहत्तराव्या वर्षी दिंडीत सहभागी झालेल्या पिंपळगाव बसवंत येथील सावित्राबाई मोरे यांनी आजवर आषाढी कार्तिकेसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणाऱ्या वारीत तब्बल तीस वर्षांपासून गावातील महिलांसह सहभाग होत असल्याचे सांगितले. पाच वर्षापूर्वी पतीचे निधन झाले, तत्पूर्वी आम्ही दोघेही दिंडीत सहभागी होत असल्याची आठवण त्यांनी ‘सकाळ’ कडे कथन केली. तर, निवृत्तीनाथ महाराज दिंडीत गत चाळीस वर्षांपासून जात असल्याचे व त्याद्वारे साक्षात विठूमाऊलीसह सर्वच संतांचा सहवास घडत असल्याचे चांदवड येथील पुंजाबाबा ठाकरे यांनी सांगितले.

Departure of Varakras to Trimbak Nagar in the wake of Vithunama
Nashik News : नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेची फसवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.