esakal | यंदा राज्यात उन्हाळी हंगामात पेरण्यांचा टक्का वाढला!
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा राज्यात उन्हाळी हंगामात पेरण्यांचा टक्का वाढला

यंदा राज्यात उन्हाळी हंगामात पेरण्यांचा टक्का वाढला!

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : राज्यात उन्हाळी हंगामातील पिकांखालील क्षेत्र एक लाख ८१ हजार हेक्टर असून, गेल्या वर्षी दोन लाख ३० हजार हेक्टरवर म्हणजेच १२७ पेरण्या झाल्या होत्या. यंदा तीन लाख १९ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र ४९ टक्क्यांनी अधिक आहे. यंदा उन्हाळ मका आणि इतर तृणधान्याचे क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे.

अवकाळी दणक्याने ३०९७ हेक्टर क्षेत्र बाधित

पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, कोकण, नाशिक व नागपूर विभागात या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अवकाळीने दणका दिला. त्यात आठ जिल्ह्यांतील तीन हजार ९७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामध्ये गहू, बाजरी, मका, तीळ, भुईमूग, आंबा, संत्रा, लिंबू, पपई, कांदा आणि भाजीपाल्याचा समावेश आहे. दरम्यान, यंदाच्या उन्हाळी हंगामात पेरणी झालेल्या १७६ टक्क्यांपैकी भात फुलोरा ते दाणे भरण्याच्या, तर भुईमूग आऱ्या लागणे ते शेंगा धारण अवस्थेत आहे. बाजरी कणसांमध्ये दाणे भरण्याच्या स्थितीत आहे. मका वाढीच्या अवस्थेत आहे. गेल्या वर्षी उन्हाळी भाताची ७० हजार २३२, तर यंदा एक लाख सात हजार ९५२ हेक्टरवर लागवड झाली आहे. मक्याची लागवड गेल्या वर्षी ५१ हजार ५७०, तर यंदा ४४ हजार ४८६ हेक्टरवर झाली आहे. इतर तृणधान्याची गेल्या वर्षी ३२ हजार ३१९ आणि यंदा २९ हजार ७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. उन्हाळी हंगामातील आतापर्यंतच्या पेरणीची टक्केवारी अशी इतर कडधान्य- ३६७, भुईमूग- १६०, सूर्यफूल- २१४, तीळ- ४४३.

हेही वाचा: लेकाच्या डोक्यावर अक्षता टाकून कृषिमंत्री लगेच ऑन फिल्ड!

नाशिक विभागात १३० टक्के पेरणी

नाशिक विभागातील उन्हाळी हंगामातील पिकाखालील क्षेत्र २७ हजार हेक्टर इतके असून, प्रत्यक्षात ३६ हजार हेक्टवर म्हणजेच १३० टक्के पेरण्या झाल्या आहेत. भुईमूग, मका, सूर्यफूल, बाजरी, तीळ ही पिके वाढीच्या अवस्थेत आहे. अडसाली, पूर्वहंगामी, सुरू ऊसवाढीच्या अवस्थेत असून, आंतरमशागतीची कामे सुरू आहेत.

जिल्ह्यातील धरणसाठा सात टक्क्यांनी कमी

नाशिक जिल्ह्यातील मोठ्या सात आणि मध्यम १७ अशा २४ प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी एप्रिलच्या अखेरच्या टप्प्यात ४५ टक्के साठा होता. यंदा हा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत सात टक्क्यांनी कमी म्हणजेच ३८ टक्के उरला आहे. धरणनिहाय साठ्याची टक्केवारी अशी ः गंगापूर- ४७, कश्‍यपी- ४७, गौतमी गोदावरी- १८, आळंदी- २७, पालखेड- २३, करंजवण- १९, वाघाड- १२, ओझरखेड- ३०, पुणेगाव- १३, तिसगाव- १२, दारणा- ५७, भावली- ४६, मुकणे- ४१, वालदेवी- ७८, कडवा- २२, नांदूरमध्यमेश्‍वर- ९९, भोजापूर- ३५, चणकापूर- ४१, हरणबारी- ५५, केळझर- ३७, नाग्यासाक्या- ११, गिरणा- ४०, पुनंद- १५.

हेही वाचा: कोविड सेंटरमध्ये 'नो स्टंटबाजी'; एकाच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये पेटला वाद

loading image