शेतकऱ्यांनो कांदा सांभाळा...! चोरांची नजर आता कांद्यावर देखील; वाचा काय घडले?

onion.jpg
onion.jpg
Updated on

नाशिक : (नामपूर) कांद्याचे भाव दिवसागणिक वाढत असताना कांदा चोरीच्या घटनांनी कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. अशीच घटना नामपूर येथील प्रगतशील शेतकरी तथा शिवछत्रपती सहकारी मंगल कार्यालयाचे माजी संचालक शशिकांत सावंत यांच्या बाबतीत घडली. शेताचे प्रवेशद्वार तोडून चोरट्यांनी उन्हाळ कांदा, ठिबकच्या नळ्या, पिस्टन नळ्या असा सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

असा आहे प्रकार

कांदा उत्पादक शेतकरी शशिकांत सावंत यांची साक्री रस्त्यालगत (गट क्र. -१०३) मध्ये सुमारे पाच एकर शेती आहे. मार्च महिन्यात त्यांनी उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतले. भविष्यात कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेने आपल्या कांदाचाळीत साठवून ठेवला. गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दराने दोन हजार रुपयांचा टप्पा पार केल्याने श्री. सावंत समाधानी होते. त्यांनतर त्यांनी दोन ट्रॉली कांदा विकला. परंतु शुक्रवारी (ता. ११) सकाळी शेतात गेल्यानंतर कांदा व ठिबकसिंचन संच चोरीस गेल्याचे उघडकीस आले. आपल्या शेतातील सुमारे दहा क्विंटल कांदे, पाच एकर क्षेत्रावरील ठिबक सिंचनाच्या नळी, ९०० फूट पिस्टनची नळी असा ऐवज चोरून नेला. कांदा चाळीमध्ये कांदा नसल्याने त्यांना जबर धक्काच बसला. 

परिसरात पाहणी केली असता शेतापासून काही अंतरावरच थोडे फार कांदे पडले होते. त्याठिकाणी गाडीच्या चाकाचे वण दिसून आले. चोरट्यांनी गाडीत कांदा चोरून नेल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. विक्री आधीच चोरट्यांनी शेतातील कांद्यावर डल्ला मारल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. चोऱ्यांमागे स्थानिक चोरट्यांचाच हात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com