बापरे! कारमधून चक्क २५ लिटर पेट्रोल गायब?? आश्चर्यचकित घटनेने होतेय चर्चा

petrol theft 1.jpg
petrol theft 1.jpg

नाशिक : लॉकडाऊन शिथिलतेनंतर शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. याचा परिणाम म्हणून लहान-मोठ्या चोरीच्या घटनांसह घरफोड्यांमध्येही वाढ झाली आहे. नाशिक शहरात अशीच एक घटना घडली आहे. जो चर्चेचा विषय ठरत आहे.

काय घडले नेमके?

उपनगर येथील तरणतलावाजवळ जयंत नामदेवराव फुलकर ( ५७) यांनी त्यांचे चारचाकी वाहन उभे केले होते. अज्ञाताने त्यांच्या कारच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पेट्रोलने भरलेली टाकी पुर्णपणे रिकामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फुलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात भुरट्या चोराविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. चारचाकीमधून पेट्रोल गायब करण्यापर्यंत भुरट्या चोऱ्या आता शहरात घडू लागल्याने नागरिकांनी त्यांच्या दारापुढे चारचाकी वाहने उभी करणेही धोकादायक झाले आहे. दुचाकी, चारचाकी वाहने गायब करण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेलेली आहे; मात्र या अज्ञात भुरट्या चोराने केवळ कारच्या इंधनावरच डल्ला मारत सुमारे दोन हजार रूपयांचे पेट्रोल गायब केले. लॉकडाऊन शिथिलतेनंतर शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून लहान-मोठ्या चोरीच्या घटनांसह घरफोड्यांमध्येही वाढ झाली आहे.याप्रकरणी पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.",

आश्चर्यचकित चोरीची भर

दुचाकीतून पेट्रोल चोरीच्या घटना या अद्याप कानी येत होत्या; मात्र लॉकडाऊन शिथिलतेनंतर शहरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये एक आश्चर्यचकित चोरीची भर पडली आहे. भुरट्या चोरट्याने एका कारमधून पेट्रोल चोरी करण्याची शक्कल लढविली अन् एक दोन नव्हे तर तब्बल २५ लिटर पेट्रोल चोरी केल्याची घटना घडली.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com