
नाशिक : डिसेंबरमध्ये तिसऱ्यांदा पन्नासहून अधिक पॉझिटिव्ह
नाशिक : डिसेंबर महिन्याला सुरवात झाल्यापासून नव्याने आढळणाऱ्या दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या पन्नासहून कमी राहत होती; परंतु या महिन्यात तिसऱ्यांदा मंगळवारी (ता. १४) जिल्ह्यात आढळलेल्या दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या पन्नासहून अधिक राहिली. ५२ रुग्णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर २८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. एका बाधिताच्या मृत्यूची नोंद आहे. उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या ३५३ झाली आहे.
मंगळवारी नाशिक महापालिका क्षेत्रात आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक राहिली. या क्षेत्रात ३० रुग्णांना कोरोनाची लागण झाली. नाशिक ग्रामीणमधील १७, मालेगावच्या दोन, तर जिल्ह्याबाहेरील तिघांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एका बाधिताच्या मृत्यूची नोंद असून, मृत हा नाशिक महापालिका क्षेत्रातील आहे. प्रलंबित अहवालांची संख्या पुन्हा दोन हजारांहून अधिक झालेली आहे.
हेही वाचा: विराट-कुंबळेंच्या वादाचे कारण ठरलेल्या चायनामनचा बर्थडे
सायंकाळी उशिरापर्यंत दोन हजार २३४ अहवाल प्रलंबित होते. यांपैकी नाशिक ग्रामीणमधील एक हजार ७५२ रुग्णांना अहवालाची प्रतीक्षा होती. नाशिक महापालिका क्षेत्रातील ३४२, मालेगावच्या १४० रुग्णांनादेखील अहवालाची प्रतीक्षा कायम होती. दिवसभरात आढळणाऱ्या संशयित रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झालेली आहे. जिल्हाभरातील रुग्णालये व गृहविलगीकरणात अवघे १२ रुग्ण दाखल झाले. यांपैकी सहा रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रातील होते. जिल्हा रुग्णालयात व डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येकी दोन रुग्ण दाखल झाले, तर मालेगावला दोन संशयित रुग्ण आढळल्याची नोंद आहे.
Web Title: Third Time In December More Than Fifty Positive
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..