
नाशिक : यंदा पोषक वातावरणामुळे आंब्याची झाडे बहरली
इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यात गेल्या वर्षी गावरान आंब्याला मोहोर जास्त नव्हता. त्यामुळे अनेकांच्या पदरी निराशा पडली. मात्र यंदा गावरान आंब्याची झाडे बहरली असून, मोहोर चांगला आल्याने देशी गावरान आंबे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. दुसरीकडे आंब्याची झाडे मोहोराने बहरल्याने मधमाशांसाठी भोजनाची जोरदार व्यवस्था झाली आहे. यामुळे मधाच्या उत्पादनात वाढ होणार आहे. यंदा चांगला पाऊस पडल्याने शेती शिवारातील आंब्याच्या झाडाला मोठा मोहोर आला असून, तालुक्यातील आंब्याची झाडे मोहोरांनी बहरली आहेत.
हेही वाचा: नाशिक: प्रशासन- महापौर वादाचे ‘रामायण’ संपुष्टात
डिसेंबर ते जानेवारीत आंब्याला मोहोर येण्यास प्रारंभ होतो. दोन वर्षांत पावसाचा अनियमितपणा, गारपीट, वादळी वारे यामुळे मोहोराचे प्रमाण कमी होते. याचा व्यापारी व शेतकऱ्यांना फटका बसला. यंदा सुरवातीपासून पावसाळा अखेरपर्यंत अधूनमधून सतत चांगल्या प्रकारे पडल्याने आंब्याला मोहोर भरल्याने शेती शिवार फुलले आहे.
हेही वाचा: नाशिक : आदिवासी कुटुंबातील लेकरांना मदतीचा हात
काही शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत (Agriculture Department) एक ते दोन एकर याप्रमाणे स्वतंत्र आंब्याच्या बागा उभारल्या. अपेक्षेप्रमाणे थंडी असल्यामुळे लहान मोठ्या आंब्याच्या झाडाला मोहोर आला आहे. मोहोर येऊन फळधारणा झाल्यास आंबा मार्चअखेर बाजारात येईल. एकूणच यावर्षी चांगला पाऊस पडल्याने झाडाची वाढही जोमदार झाली असून, शिवारातील गावरान आंब्याच्या झाडासह शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर लावलेल्या हापूस, केशर या आंब्याच्या झाडाला मोहोर बहरला आहे.
हेही वाचा: युद्धाच्या भडक्यामुळे खत टंचाईचे ढग : विवेक सोनवणे
Web Title: This Year Mango Trees Bloom Due To The Nutritious Environment In Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..