Flood Mock Drill: ...अन्‌ त्यांना बुडताना वाचविले! चांदोरीत पूर प्रवण क्षेत्रात मॉकड्रिलचा थरार

Province Hemangi Patil, Tehsildar Sharad Ghorpade, Bajirao Pawar, P. Y. Qadri, Vinayak Kharat, Sagar Gadakh etc.
Province Hemangi Patil, Tehsildar Sharad Ghorpade, Bajirao Pawar, P. Y. Qadri, Vinayak Kharat, Sagar Gadakh etc.esakal

Flood Mock Drill : येथील गोदावरी नदीपात्रात दोन व्यक्ती बुडल्याचा निनावी संदेश प्रांत हेमांगी पाटील यांना बुधवारी (ता. १४) सकाळी मिळताच त्यांनी यंत्रणेच्या माध्यमातून पोलीस व महसूल यंत्रणेस माहिती दिली.

स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीचे सागर गडाख यांना ही माहिती मिळताच त्यांनी समितीच्या इतर सदस्यांना कळविले. शासकीय यंत्रणांची एकच धावपळ उडाली अन्‌ सर्व शासकीय यंत्रणा तातडीने चांदोरीत दाखल झाल्या. (Thrill of mock drill in flood prone area in Chandori nashik news)

पोलीस खात्याकडूनही त्वरित स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीशी समन्वय साधत तेही घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी एक रुग्णवाहिका, इतर कार्यालयीन वाहनेही तातडीने हजर केली गेली.

आपत्ती व्यवस्थापनचे सदस्य, पोलिस, महसूल कर्मचारी, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन टीमने गोदावरी नदीत बुडणाऱ्या दोघांना बाहेर काढून नदीकिनारी सुरक्षित स्थळी आणत त्यांच्यावर किनाऱ्यावरच प्राथमिक उपचार केले.

पूर प्रवण क्षेत्रात सर्व यंत्रणांना अचानक पाहून, तसेच दोन व्यक्ती बुडल्याच्या बातमीने चांदोरी व परिसरातील ग्रामस्थ संभ्रमित झाले. मात्र, नदीमध्ये बुडणाऱ्यास वाचविण्याची ही रंगीत तालीम होती, हे कळताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

चांदोरीच्या आपत्ती व्यवस्थापन टीमतर्फे ही रंगीत तालीम करण्यात आली. पूर आल्यावर प्रथम कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे, बचावकार्यासाठी आपत्कालीन व्यवस्था येईपर्यंत काय करावे, औषधोपचार कसे केले पाहिजेत या सर्व गोष्टींचे प्रात्यक्षिक या वेळी सदस्यांनी दाखविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Province Hemangi Patil, Tehsildar Sharad Ghorpade, Bajirao Pawar, P. Y. Qadri, Vinayak Kharat, Sagar Gadakh etc.
Water Supply Stop : 24 तासापासून जेल रोड पाण्याविना!

प्रांताधिकारी सौ. पाटील यांच्यासह तहसीलदार शरद घोरपडे, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक बाजीराव पवार, सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी, सुजाता वायाळ, पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड,

मंडलाधिकारी नंदू कुंदे, सरपंच विनायक खरात, तलाठी सत्यम चौधरी, कल्पना पवार, ग्रामविकास अधिकारी सुरेश भांबारे, विलास सूर्यवंशी, फकिरा धुळे, किरण वाघ, बाळू आंबेकर, सोमनाथ कोटमे, अमोल कर्डीले, किसन जाधव, सचिन कांबळे आदींसह ग्रामस्थ व शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

"प्रशासनाच्या माध्यमातून पूर परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर करावयाच्या उपाययोजना राबविण्यात येणार असून, चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीचे कार्य कौतुकास्पद व दखलपात्र आहे."

-हेमांगी पाटील, उपविभागीय अधिकारी, निफाड

Province Hemangi Patil, Tehsildar Sharad Ghorpade, Bajirao Pawar, P. Y. Qadri, Vinayak Kharat, Sagar Gadakh etc.
Nashik Bribe Crime: कामगार उपायुक्त कार्यालयातील महिला निरीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com