नाशिक : पर्यटकांच्या मांदियाळीने पर्यटनास मिळणार बूस्ट

पर्यटनावर अवलंबून असलेले विविध व्यवसायात तेजी निर्माण होणार
Crowds of Tourists
Crowds of Touristsesakal

जुने नाशिक : कोरोना निर्बंध संपुष्टात आणि पर्यटकांची होणारी गर्दीमुळे यंदा शहरातील पर्यटनास चांगला बूस्ट मिळणार आहे. पर्यटनावर अवलंबून असलेले विविध व्यवसायात तेजी निर्माण होणार आहे. बहुतांशी प्रमाणात पर्यटकांची रेलचेल सुरू झाली असल्याने संबंधित सर्व घटकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

कोरोना प्रादुर्भाव आणि त्याचे निर्बंध नागरिकांमध्ये असलेल्या भीतीमुळे गेल्या दोन वर्षात पर्यटनावर आधारित सर्व व्यवसाय गडगडले होते. पर्यटन स्थळ आणि धार्मिकस्थळ बंद होते. अनेक व्यवसाय बंद पडले. पर्यटकांना त्यांच्या मनाप्रमाणे पर्यटनस्थळी जाण्यावर निर्बंध आणले होते. त्यामुळे त्यांच्याकडूनदेखील नाराजी व्यक्त केली जात होती. उन्हाळ्याच्या सुटीमध्ये सर्वत्र पर्यटकांचा वावर असल्याने पर्यटनस्थळांना यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. परिसरातील विविध प्रकारच्या व्यवसायात तेजी येते. दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे शुकशुकाट पसरलेला होता. यंदा मात्र सर्व निर्बंध हटविण्यात आल्याने पर्यटकांसाठी शहरातील सर्व पर्यटनस्थळ उघडे करून देण्यात आले आहे. काही राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी लागल्याने पर्यटक शहरात दाखल होण्यास सुरवात झाली आहे. दोन वर्ष घरातच बसून राहावे लागले होते. यंदा मात्र दोन वर्षाची कमी भरून काढत मुक्तपणे पर्यटनस्थळी जाण्याची पुन्हा संधी आली आहे. त्याचा पर्यटकांकडून पुरेपूर फायदा घेतला जात आहे.

Crowds of Tourists
नाशिक : कोणत्याही धर्मापेक्षा मानवता धर्म सर्वश्रेष्ठ

सध्या सोमेश्वर, गंगापूर, पंचवटी, तपोवन, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी अशा विविध पर्यटन स्थळांना पर्यटकांकडून गर्दी केली जात आहे. यामुळे या वर्षी पर्यटनासह पर्यटनावर अवलंबून व्यवसायांना बूस्ट मिळणार आहे. गंगापूर धरणालगत असलेले बोट क्लब, तसेच सोमेश्वर मंदिर परिसरातील बोट क्लब यांना पर्यटकांची चांगली पसंती मिळत आहे. त्यातून महापालिका आणि संबंधित विभागांना चांगला महसूल प्राप्त होणार आहे. येत्या काही दिवसात राज्यातील जिल्ह्यातील शाळांनादेखील सुटी लागणार आहेत. त्यातून पर्यटकांची गर्दी वाढणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले.

Crowds of Tourists
नाशिक : जनजातीय स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणार्थ महारांगोळी; पाहा Photos

"गेल्या दोन वर्षानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे पर्यटन आणि धार्मिक स्थळ या ठिकाणी शुकशुकाट पसरला होता. त्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. यंदा मात्र परिस्थिती पूर्वपदावर आल्याने पर्यटनाला बूस्ट मिळणार आहे. त्यातून पुन्हा एकदा पर्यटन संबंधित व्यवसाय आणि घटकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल."

- राहुल बर्वे, अध्यक्ष, सोमेश्वर देवस्थान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com