चिनी आकाशकंदिलांवर फुली, इकोफ्रेंडलींची मोहिनी; बांबूंच्या लक्षवेधी कलाकृती बाजारात

Traditional eco-friendly sky lanternsTraditional eco-friendly sky lanterns
Traditional eco-friendly sky lanternsTraditional eco-friendly sky lanterns

नाशिक/पंचवटी : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दीपावलीची लगबग सर्वत्र सुरू आहे. यंदा भारत-चीन तणावाच्या पार्श्‍वभूमीवर प्रथमच चीनकडून आयात आकाशकंदिलांवर फुली मारण्यात आली असून, पारंपरिक इकोफ्रेंडली आकाशकंदिलांची ग्राहकांवर मोठी मोहिनी आहे. 

पारंपरिक आकाशकंदिलाला मोठी मागणी

चिमुरड्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आकर्षण असलेली दिवाळी येऊन ठेपली आहे. मांगल्याचे प्रतीक असलेल्या सणाला घरोघरी आकाशकंदील लावण्याची प्राचीन परंपरा आहे. कधीकाळी दिवाळीपूर्वी महिनाभर आकाशकंदील बनविण्याची लगबग सुरू होत होती. साधारण ऐंशीच्या दशकापर्यंत आकाशकंदील घरोघरी तयार होत. आता इलेक्ट्रॉनिक, डिजिटलच्या जमान्यात वेगवेगळ्या आकारातील आकाशकंदील बाजारात आले आहेत. तरी कधीकाळी या आकाशकंदिलात विजेच्या दिव्याऐवजी पणती ठेवली जात असे. अजूनही ज्या भागात वीज पोचली नाही, अशा आदिवासी पाड्यांवर, दुर्गम भागात आकाशकंदिलात तेलाच्या पणत्याच ठेवण्याची पद्धत आहे. गेल्या वर्षापर्यंत चीनच्या आकाशकंदिलाचा आपल्याकडे मोठा बोलबाला होता. सुटसुटीत आकारातील व अल्प किमतीत उपलब्ध होणाऱ्या चांदण्यांची आपल्याकडे मोठी क्रेझ होती. सध्या भारत-चीन संबंधात कमालीचा तणाव निर्माण झाल्याने चिनी आकाशकंदिलाऐवजी स्थानिक बनावटीच्या पारंपरिक आकाशकंदिलाला मोठी मागणी आहे. बाजारात शंभर रुपयांपासून दीड हजार रुपये किमतीपर्यंतचे आकाशकंदील उपलब्ध आहेत. 

हस्तकलेला मागणी 
शहरात पारंपरिक चांदण्या, लॅम्पसबरोबरच टाकाऊ वस्तूंपासून आदिवासी बांधवांनी बनविलेल्या आकाशकंदिलांना मोठी मागणी आहे. अत्यंत सुबक पद्धतीने बनविलेले हे आकाशकंदील यंदा मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध असून, त्यांनाही मोठी मागणी आहे. याशिवाय बांबूंवर अतिशय सुरेख कोरीव काम केलेले आकाशकंदीलही पेठ, सुरगाणा, हरसूल भागातून शहरात दाखल झाले आहेत. 


भारत-चीन तणावाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा टाकाऊ वस्तूंपासून बनविलेल्या व भारतीय बनावटीच्या आकाशकंदिलांना मोठी मागणी आहे. 
- गार्गी परदेशी, आकाशकंदील व्यावसायिक 

 
या वर्षी प्रथमच आदिवासी बांधवांनी कलाकुसर केलेले आकर्षक आकाशकंदील बाजारात दाखल झाले असून, ग्राहकांचा त्याकडे ओढा आहे. 
- दुर्गेश व्यवहारे, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com