भाविकांची लुट रोखण्यासाठी वाहतूक पोलिस- रिक्षा संघटना साधणार समन्वय

Police-Rickshaw driver coordination
Police-Rickshaw driver coordinationesakal

नाशिक : तीर्थाटनानिमित्त नाशिकला येणाऱ्या भाविकांची रिक्षाचालकांकडून होणारी आर्थिक लूट रोखण्यासाठी नाशिक शहर वाहतूक पोलिस, श्रमिक रिक्षा सेना नाशिक महानगर यांच्या माध्यमातून ठोस उपाययोजना आखण्यात येणार आहे.

तसेच, गोदाघाटावर अनधिकृत रिक्षाचालकांकडून होणारा त्रास रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून चाप लावण्याचाही प्रयत्न शहर पोलिस करणार आहेत. यामुळे देशभरातून नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांना तीर्थाटन करणे सुलभ होण्यासाठी सकारात्मतेने पावले टाकली जाणार आहेत. (Traffic Police Rickshaw Association will coordinate to prevent looting of devotees nashik Latest Marathi News)

श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि सिंहस्थ कुंभमेळा यामुळे नाशिकचे पौराणिक व धार्मिक महत्त्व जगविख्यात आहे. त्यामुळे देशभरातूनच नव्हे, तर परदेशातून भाविक तीर्थाटनासाठी नाशिकला येत असतात. मात्र, या भाविकांची गोदाघाटावर असलेल्या रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारून लूट केली जाते.

या ठिकाणी श्रमिक रिक्षा सेना या संघटनेचा अधिकृत रिक्षाथांबा असताना काही अनधिकृत रिक्षाचालक व टवाळखोरांकडून मुजोरी केली जाते. त्याचा त्रास भाविकांसह अधिकृत रिक्षाचालक, टुरिस्ट गाइड‌ला होतो. यामुळे नाशिकच्या प्रतिमेला तडा जातो.

भाविकांची होणारी आर्थिक लूट रोखण्यासाठी गोदाघाटावरून विविध धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठीचे मीटरप्रमाणे वा शेअरिग रिक्षाप्रवासाचे दरफलक लावण्यासाठी श्रमिक रिक्षा संघटनेचा सकारात्मक प्रतिसात आहे.

Police-Rickshaw driver coordination
मालेगाव : मोसम नदीत बुडाले दोघे तरुण; शोध कार्य सुरु

त्यासाठी नाशिक शहर वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून श्रमिक रिक्षा सेना ठोस उपाययोजना करणार आहे. यामुळे अनधिकृत रिक्षाचालकांनाही चाप बसू शकेल आणि भाविकांची आर्थिक लूट रोखता येणे शक्य होणार आहे.

"गोदाघाटावर अधिकृत रिक्षाथांबा आहे. तरीही काही अनधिकृत रिक्षाचालकांकडून दमदाटी करून भाविकांची पळवापळवी केली जाते. श्रमिक संघटनेच्या माध्यमातून शहर वाहतूक पोलिस शाखा व प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने भाविकांची आर्थिक लूट रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील."

- मामा राजवाडे, शहराध्यक्ष, श्रमिक रिक्षा सेना नाशिक महानगर संघटना.

"देशभरातील भाविक नाशिकमध्ये येतात. त्यांची होणार आर्थिक लूट रोखण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून उपाययोजना करणे गरजेचे आहे. आरटीओ, रिक्षाचालक संघटना व वाहतूक पोलिस यांच्या समन्वयातून दरफलक लावल्यास भाविकांची होणारी आर्थिक लूट रोखता येईल. तसेच अनधिकृत रिक्षाचालकांनाही आळा बसेल."

- पौर्णिमा चौघुले- श्रींगी, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा.

Police-Rickshaw driver coordination
बबन घोलप यांच्यावर कारवाई करा; मिलिंद यावतकर यांचे निवडणूक आयोगाला निवेदन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com