Nashik Police Transfer : 8 सहायक पोलिस आयुक्तांची बदली; आनंदा वाघ आयुक्तालयात

Police
Police sakal

Nashik Police Transfer : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात आनंद वाघ यांची सहायक पोलिस आयुक्तपदी तर, संजय बांबळे यांची नाशिक ग्रामीणला कळवणचे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आलेली आहे.

वाघ, बांबळे यांची नाशिकमधूनच सहायक पोलिस आयुक्तपदी पदोन्नतीने बदली करण्यात आलेली होती, परंतु ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते. (Transfer of 8 Assistant Commissioner of Police nashik news)

शासनाच्या गृहविभागाने पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील आठ सहायक पोलिस आयुक्तांची बदली करीत पदस्थापना केली आहे. यामध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सहायक पोलिस आयुक्तपदी आनंदा वाघ, संजय बांबळे यांची पदोन्नती झाली होती.

परंतु पदस्थापना करण्यात आलेली नव्हती. दोन महिन्यांपूर्वी राज्यातील पदोन्नतीने सहायक आयुक्तपदी झालेल्या १७९ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. परंतु यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या पुन्हा रद्द केल्याने ते नव्याने पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते.

गृहविभागाने या अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेने बदल्या केल्या आहेत. यात आनंदा वाघ यांनी नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात, संजय बांबळे यांची नाशिक ग्रामीणमध्ये कळवणचे उपविभागीय अधिकारी, सुभाष कोकाटे यांची कोकण विभागातील गुन्हे अन्वेषण विभागात अपर पोलिस अधीक्षकपदी, रवींद्र होवाळे यांची पुणे शहरात सहायक आयुक्तपदी, युवराज मोहिते यांची पुणे ग्रामीणमध्ये उपअधीक्षक (मुख्यालय), सुशीलकुमार नायक यांची नांदेड येथे उपविभागीय अधिकारी, भागवत सोनवणे यांची मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलिस अधीक्षकपदी पदस्थापना करण्यात आलेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Police
Nashik Police Transfer : आयुक्तालय हद्दीतील सहायक निरीक्षकांच्या बदल्या; आयुक्त अंकुश शिंदे यांचे आदेश

गुन्हेशाखेत उत्कृष्ट कामगिरी

आनंदा वाघ यांनी नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात दहशतवाद विरोधी पथकासह मुंबई नाका पोलिस ठाणे आणि गुन्हेशाखेच्या युनिट एक व दोनमध्ये काम केलेले आहे. विशेषतः: गुन्हेशाखेत काम करताना त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल करीत गुन्हेगारांना गजाआड केले आहे.

मुथ्युट फायनान्सवरील दरोड्यासह काही महिन्यांपूर्वी पाथर्डी फाटा येथील कंपनी व्यवस्थापकाच्या खुनाची उकलही त्यांनीच केली होती. निष्णात पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख राहिली आहे.

Police
Nashik News : अपघातात जखमी झालेल्या बालिकेच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com