"खातरजमा न करता माहिती प्रसारित केल्यास कायदेशीर कारवाई होणार" - जिल्हाधिकारी

suraj-mandhre.jpeg
suraj-mandhre.jpeg

नाशिक : कोरोनासंबंधी औषधोपचारविषयक अंधश्रद्धा निर्माण करणे, अधिकृत मान्यता नसलेल्या कोणत्याही बाबी आणि धार्मिक-जातीय तेढ निर्माण करणाऱ्या अथवा जनतेत भीती निर्माण करणाऱ्या बाबी अधिकृत खातरजमा न करता प्रसारित केल्यास कायदेशीर कारवाई होईल. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 (2) चे उल्लंघन केल्यास व्यक्ती अथवा समूह भारतीय दंड विधान संहिता कलम 188 आणि इतर प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यासंबंधीचे आदेश सोमवारी (ता. 6) जारी केला आहे. 

सूरज मांढरे : व्यक्ती अथवा समूह शिक्षेस पात्र 
लॉकडाउनच्या काळात कोणतीही माहिती खातरजमा न करता सोशल मीडिया, विविध प्रसारमाध्यमांमधून पसरविली जात आहे. त्यामुळे समाजात विनाकारण भीती निर्माण होत असल्याचे जाणवते, असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी मांढरे यांनी आदेशात म्हटले आहे, की संदेश, अफवा, बातमीमुळे सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्‍यता आहे. अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. अशी उपाययोजना कलम 144 मधील तरतुदीच्या अनुषंगाने आदेश देण्यात येत आहे. 

आक्षेपार्ह प्रसारित केल्यास गुन्हा 
सोशल मीडिया, एस.एम.एस., व्हॉट्‌सऍप, फेसबुक, ट्विटर, टिकटॉक, हॅलो, टेलिग्राम अथवा इतर कोणत्याही डिजिटल माध्यमांमध्ये दोन समाजात जातीय- धार्मिक तेढ निर्माण होईल, असे कोणतेही प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह संदेश, साहित्य, चित्रफीत कोणत्याही व्यक्ती अथवा समूहाला प्रसारित करता येणार नाहीत. तसे घडल्यास ग्रुप ऍडमिनला वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com