Nashik Land Scam : पाथर्डीतील तीन एकर जमीन हडपण्याचा डाव; नऊ जणांवर गुन्हा दाखल
Tribal Land Scam in Pathardi Area Exposed : नाशिकमधील पाथर्डी शिवारातील आदिवासी जमिनीवर बनावट गृहनिर्माण संस्थेच्या नावाने बळकावण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून, याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक- पाथर्डी शिवारातील तीन एकर १२ गुंठ्यांची आदिवासी जमीन बळकावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.