esakal | सिन्नर भूषण ह.भ.प. त्र्यंबक भगत भैरवनाथ यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

sinner

सिन्नर भूषण त्र्यंबकबाबा भगत भैरवनाथ यांचे निधन

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : सिन्नरचे भूषण अध्यात्मिक क्षेत्रातील थोर मार्गदर्शक ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत आज (ता.९) गुरुवारी पहाटे ५ वाजता त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ८९ व्या वर्षी श्री भैरवनाथ चरणी लीन झाले. त्यांच्या निधनाने सिन्नर तालुका व राज्यभरात पसरलेला भक्त परिवार शोकमग्न झाला आहे. जन्मांध असूनही त्रंबक बाबा यांची हार्मोनियमवर मोठी पकड होती. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा मुखोद्गत होती. संपूर्ण जगात त्यांचे लाखो अनुयायी आणि भक्त मंडळी आहेत. ते ब्रह्मचारी होते .त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पुतणे,लाखो भक्त असा परिवार आहे. येणाऱ्या प्रत्येकाचे दुःख निवारण करणे हा त्यांचा स्वभाव होता.

सिन्नर येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराचा त्यांनी जिर्णोद्धार केला होता. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून राज्यातील अनेक नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार यांचे त्यांनी संघटन केले होते व राज्यातील एक आदर्श सप्ताह सुरू केला होता. हरतालिकाच्या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे. याच मुहूर्तावर त्यांनी आपला देह ठेवला आहे. मागील दोन वर्षापासून त्यांनी सर्व भक्तांना सांगितले होते. मी 2021 पर्यंत आहे तो त्यांनी आपला शब्द खरा करून ठेवला आहे. सिन्नर येथे सायकांळी 4 वा.अत्यंसंस्कार होणार आहे.

हेही वाचा: येवला तालुक्यातही पावसाचा कहर; सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान

हेही वाचा: फाइल अडवून ठेवणाऱ्यांची वेतनवाढ थांबवा; झेडपीच्या सभेत ठराव

loading image
go to top