सत्तावीस लाखांची दारू चोरणारे दोघे जेरबंद

drink
drinkesakal

नाशिक रोड : शिंदे गावाजवळील नायगाव रोडवरील विदेशी दारूच्या गोडाउन (Two arrested for stolen liquor) सुरक्षारक्षकाला मारहाण करून त्याला बांधून ठेवून सुमारे २७ लाख रुपये किमतीच्या दारूच्या बॉक्सची चोरी झाली होती. पोलिसांनी तापास करून २६९ बॉक्स २७ लाखांचा माल जप्त केला असून, दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

27 लाखांची दारू चोरी

दीपक दत्तात्रय नाईक (रा. गंधर्वनगरी, नाशिक रोड) यांनी तक्रार दिली होती. नायगाव रोड येथे राजस्थान लिकर लिमिटेड कंपनीचे विदेशी दारू कंपनीचे गोडाउन आहे. ९ मेस वॉचमन मयूर शांताराम मगर यास मारहाण करून बांधून ठेवत ३७० बॉक्समधील २६, ९४, २०३ रुपये किमतीची दारू आयशर गाडीत भरून चोरून नेली होती. मुख्य संशयित फरारी आहेत. तीन चारचाकी वाहने, असा ४३ लाख ३२ हजार ८२० रुपयांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याबाबात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

23 लाखांचा माल जप्त

पोलिसांनी तपास केला असता, चोरीमध्ये वापरलेल्या आयशर गाडीमधील (एमएच ४३, बीजी ६७४८) ड्रायव्हरला बेशुद्ध करून गाडी मुळशी (पुणे) येथे नेली. तेथे गाडीमधील दारूचे बॉक्स खाली करून गाडी पुन्हा मुंबईला पाठविण्यात आली. मुळशी येथील दारूचे बॉक्स अल्टो, स्कॉर्पिओ भरून ते जालना येथे विक्री करताना आढळले. पोलिसांनी छापा टाकून विक्री करणारे संशयित मुक्तार अहमद हसन महम्मद शेख (रा. पूँच, जम्मू-काश्मीर), शंकर मंजू गौडा (रा. चांद्रपट्टना, कर्नाटक) यांना ताब्यात घेतले. आणखी सात संशयित फरारी आहेत.

drink
स्थायी समितीवर सदस्य वाढीसाठी भाजपच्या हालचाली

तीनच महिन्यांपूर्वी सुटका

मुक्तार अहमद हसन महम्मद शेख यांच्यावर मुंबई, अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दोन कोटींची रक्कम एटीम फोडून लंपास केली होती, याबद्दल २०१६ पासून तो कारागृहात होता. तीनच महिन्यांपूर्वी त्यांची सुटका झाली होती. पोलिसांनी मुख्य संशियतांचे रेखाचित्र बनविले असून, शोध सुरू आहे. वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शेळके तपास करीत आहेत.

drink
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नाशिक महापालिका सज्ज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com