भाजपचे नेते संपर्कात, मात्र सेनेकडून चुप्पी; राऊतांच्या नाशिक दौऱ्यावरुन राजकीय चर्चेला उधाण

two BJP leaders will join shivsena during MP Sanjay Rauts visit to Nashik marathi news
two BJP leaders will join shivsena during MP Sanjay Rauts visit to Nashik marathi news
Updated on

नाशिक : खासदार संजय राऊत दोन दिवसांनी नाशिक मध्ये येणार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले. गुरुवारी (ता. 7) त्यांचा दौरा निश्चित झाला असून या दौऱ्यात ते भाजपला शह देण्यासाठी भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांशी शिवसेना पक्ष प्रवेशासंदर्भात चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.

भाजप व शिवसेनेत द्वंद सुरु

शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत गुरुवारी नाशिक दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते भाजपच्या दोन प्रदेश उपाध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. हे दोन नेते वसंत गिते व सुनिल बागुल असल्याचे बोलले जात असले तरी दोघांनी असा कुठलीचं चर्चा नसल्याचे सांगितले. तर शिवसेनेच्या नेत्यांनी अनेक नेते संपर्कात असल्याचे सांगताना भाजपला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. नेमके कोणते नेते संपर्कात आहेत याबाबत मात्र स्पष्टीकरण दिले जात नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप व शिवसेनेत द्वंद सुरु झाले आहे. महाविकास आघाडीत भाजपकडून शिवसेनेला दररोज टार्गेट केले जात आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून सेना नेत्यांना ईडीच्या नोटीस पाठवून बेजार केले जात असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेकडून देखील सत्तेच्या माध्यमातून भाजपला शह देण्याचा प्रयत्न होत आहेत. शिवसेनेसोबतचं राष्ट्रवादीकडून देखील भाजपच्या नेत्यांना पक्षात खेचण्याचे प्रयत्न होत आहेत.

दोन प्रदेशाध्यक्ष भाजपला रामराम ठोकणार?

गेल्या वर्षा अखेर एकनाथ खडसे यांना राष्ट्ववादी मध्ये घेवून राष्ट्रवादीने भाजपला मोठा दणका दिला होता. भाजप विरुध्द शिवसेना-राष्ट्रवादी या शह-काटशहाचाचं एक भाग म्हणून नाशिक मध्ये देखील राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपचे दोन प्रदेशाध्यक्ष पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या दोन उपाध्यक्षांमध्ये वसंत गिते व सुनिल बागुल यांची नावे आघाडीवर आहेत. गिते यांनी एक जानेवारीला मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. मिसळ पार्टीतून मित्रांचा गोतावळा एकत्र करण्याबरोबरचं ताकद दाखविण्याचा एक भाग होता. गिते यांची मिसळ पार्टी यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आले. गिते व बागुल दोघेही पुर्वाश्रमीचे शिवसैनिक, पक्षात त्यांना मोठी पदे मिळाली परंतू मध्यंतरीच्या काळात वैचारीक मतभेद झाल्यानंतर दोघांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकत अन्य पक्षांमध्ये प्रवेश केला. 

गीते म्हणतात, मी भाजपत समाधानी

गिते मनसे व आता भाजप मध्ये आहे तर बागुल यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादी व आता भाजप मध्ये आहेत. दोघेही पक्षात नाराज असून दोघांचाही कल शिवसेनेकडे असल्याचे बोलले जात आहे. त्यात दोघेही भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असल्याने भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. परंतू गिते यांनी आपण भाजप मध्ये समाधानी असून पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले तर बागुल यांनी गुरुवारी सुरत येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी जाणार असल्याने मी कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे सकाळ प्रतिनिधीकडे सांगितले.

गुरुवारी राऊत नाशिक मध्ये

खासदार राऊत हे गुरुवारी नाशिक मध्ये येणार आहेत. परंतू ते कुठल्या भाजप नेत्याशी चर्चा करणार आहे याबाबत माहिती नसल्याचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. मात्र भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. भाजपचे नेते शिवसेनेत प्रवेश करतील किंवा नाही याबाबत अनिश्चितता आहे मात्र चर्चेच्या माध्यमातून शिवसेनेकडून भाजपला चुचकारून संभ्रम निर्माण करण्याची खेळी खेळली जात असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The Dodheshwar Road Project in Baglan has sparked controversy over the alleged misuse of ₹7 crore in public funds.
Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
Marathi News Esakal
www.esakal.com