Two climbers were killed and one was injured in an accident at Hadabi Shendi hill
Two climbers were killed and one was injured in an accident at Hadabi Shendi hill

हडबीच्या शेंडीवरुन पडून दोन तरुण गिर्यारोहक ठार; एक जण जखमी


मनमाड (जि. नाशिक) :
हडबीची शेंडी, थमसप म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी आलेल्या दोन तरुणांचा तोल जाऊन सुमारे एकशे दहा फूट खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला, तर यातील एक तरुण जखमी झाला असून प्रस्तरारोहण करणारे इतर १२ जण सुखरूप आहे रापली, कातरवाडी, मनमाड शहरातील तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन करत सर्वांना सुखरूप पायथ्याशी आणण्यात यश मिळवले.

अहमदनगरच्या इंद्रप्रस्थ ट्रेकर्सच्या वतीने हडबीची शेंडी या सुळक्यावर आरोहण मोहिमेचे आज (ता.२) आयोजन करण्यात आले होते. १८ जण यात सहभागी झाले होते, त्यात काही मुलींचाही सहभाग होता. दुपारपर्यंत सर्व सहभागींचे यशस्वी आरोहण झाल्यानंतर सर्व सहभागींना खालच्या टप्प्यावर उतरविण्यात आले. शेवटचे तिघे जण उतरण्याच्या बेतात असताना तांत्रिक पथकाचा प्रमुख अनिल वाघ आणि मयूर मस्के हे दोघे खाली कोसळले, त्यातला एक जण जागीच गतप्राण झाला. जखमी प्रशांत पवार यास मनमाड येथे उपचारासाठी साठी तातडीने हलविण्यात आले. या अपघाताचे वृत्त कळताच कातरवाडी येथील ग्रामस्थ भागवत झाल्टे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित हडबीची शेंडी वर धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. ग्रामस्थांनीच राबविलेल्या या बचावकार्यात सर्व सहभागींना संध्याकाळपर्यंत खाली आणण्यात आले होते. शव मनमाड येथे आणण्यात आले, अशी माहिती मनमाडचे गिर्यारोहक प्रवीण व्यवहारे यांनी दिली.

Two climbers were killed and one was injured in an accident at Hadabi Shendi hill
'मुक्‍त'च्‍या परीक्षांना मंगळवारपासून होणार सुरवात; 'असे' असेल स्वरुप

याबाबत वृत्त असे की अहमदनगर येथील असलेले इंद्रप्रस्थ टेकर्स या ग्रुपचे एकूण १५ सदस्य (सर्वजण हे आज (पाईपलाईन रोड इस्तबाग चौक, अहमदनगर) मनमाड शहराजवळ असलेल्या हडबीची शेंडी, थमसप म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी आले होते या ग्रुपमध्ये ८ मुली तर ७ मुले होते यातील मुलांमध्ये दोन जण सराईत ट्रेनर होते सकाळी शेंडीच्या डोंगरावर पायथ्यापासून चढाई करण्यास सुरुवात केली यातील दोघे ट्रेनर असलेले मयूर दत्तात्रय म्हस्के, अनिल शिवाजी वाघ या दोघांनी ग्रुपमधील सर्वांची वर चढण्यासाठी असलेल्या जुन्या बोल्डिंगवर रोप लावला होता रोपद्वारे सर्वजण सुखरूप शेंडीच्या डोंगरावर चढले सर्वांनी वर चढल्यावर आंनद व्यक्त केला मनसोक्त फोटो काढले मात्र परतीच्या मार्गावर असतांना यातील ८ मुली ४ तरुण खाली उतरले मात्र पाठीमागे थांबलेले दोघे ट्रेनर बोल्डिंग मधून रोप काढत असतांना वरचे बोल्डिंग दगड ठिसूळ असल्याने सटकल्यामुळे ट्रेनर असलेले मयूर दत्तात्रय म्हस्के, अनिल शिवाजी वाघ हे दोघे डोंगरावरून खाली पडले गेले, तर यांच्यासोबत असलेला प्रशांत पवार हा तरुण देखील जखमी झाला.

हे दोघे खाली पडत असतांना डोंगरावर जाणाऱ्या काही व्यक्तींनी बघितले त्यांनी तात्काळ फोन फिरवत रापली, कातरवाडी येथील तरुणांना बोलावून घेतले अपघात झाल्याचे लक्षात येताच सदर गावातील आणि मनमाड शहरातील तरुण घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करत यातील एका मृताला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले तर दुसरा व्यक्तीला रेस्क्यू करण्यात वेळ लागल्याने अंधार पडल्यावर सदर मृत तरुणाला शोधण्यात यश आले आणि तेथून एम्ब्युलन्सने मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे जखमी प्रशांत पवार याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे तर यातील १२ तरुण तरुणींना रापली येथे माजी सरपंच संघरत्न संसारे यांच्या ग्रुपने राहण्याची खाण्याची व्यवस्था केली भागवत झालटे, पियुष गंगीले यांनीही मोठी मदत केली


Two climbers were killed and one was injured in an accident at Hadabi Shendi hill
'कलाक्षेत्रात जिंदादिल मुशाफिरी ..'; देव यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

१२ जण सुखरूप ...
इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुपच्या १५ सदस्यापैकी ८ मुली व ४ मुले हे सुखरूप खाली उतरले असून आपले ट्रेनर्स मयूर म्हस्के व अनिल वाघ हे दोघे जण पडून जखमी झाल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे या सर्वांच्या चेहऱ्यावर भीती जाणवत होती मात्र प्रत्यक्षात या दोघांचाही अपघातात मृत्यू झाला असून काळाने घाला घातल्याने त्यांचे कुटुंबीय शोकमग्न झाले आहे या १२ जणांची रापलीचे माजी सरपंच संघरत्न संसारे यांनी व्यवस्था केली त्यांना राहण्यासाठी आणि जेवण पाणी व्यवस्था केली मात्र या सर्वांच्या

Two climbers were killed and one was injured in an accident at Hadabi Shendi hill
रमेश देव यांना मोगरा फार आवडायचा;सांगितला होता फुलांचा धम्माल किस्सा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com