ब्रेकिंग! पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू; कुटुंबियांचा आक्रोश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death frnd.jpg

येथील गुरदड परिसरातील व कसमादे परिसरात सध्या पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारा चोरचावडी धबधबा चर्चेचा विषय बनला आहे. धबधब्यात भिजण्याचा व पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी पाच मित्र रविवारी चोरचोवडी येथे आले. मात्र नंतर जे घडले ते दुर्देवीच होते. वाचा काय घडले? 

ब्रेकिंग! पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू; कुटुंबियांचा आक्रोश

नाशिक : (दहीवड) येथील गुरदड परिसरातील व कसमादे परिसरात सध्या पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारा चोरचावडी धबधबा चर्चेचा विषय बनला आहे. धबधब्यात भिजण्याचा व पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी पाच मित्र रविवारी चोरचोवडी येथे आले. मात्र नंतर जे घडले ते दुर्देवीच होते. वाचा काय घडले? 

अशी आहे घटना

रविवार (ता.१३) पर्यटनासाठी वडाळीभुई (ता. चांदवड) येथील अजिंक्य जाधव, संकेत जाधव, सागर जाधव, शुभम गुजर व ऋषिकेश तोटे हे पाच युवक चोरचावडी धबधब्याच्या परिसरात पर्यटनासाठी आले होते. एकमेकांचे जीवलग असलेले हे पाच जण धबधब्यात पोहण्यासाठी उतरले. पाण्याची पातळी जास्त असल्याने पाण्यात ते डूबू लागले. त्यातील अजिंक्य, संकेत, सागर तिघांना बऱ्यापैकी पोहता येत असल्याने ते पाण्यातून कसेबसे वर आले. मात्र शुभम व ऋषिकेश या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते जागीच बुडाले. पट्टी पोहणाऱ्यांना मृतदेह शोधण्यासाठी पाण्यासाठी सोडण्यात आले तेव्हा दोन्ही मित्र एकमेकांच्या मिठीत होते. एकमेकांना बचाव करण्यासाठी प्रयत्न करत असावेत असे पोहणाऱ्यांच्या निदर्शनास आले. दोघांनाही पाण्यातून वर काढले तेव्हा मित्रांनी अश्रू अनावर झाले होते. शुभम व ऋषिकेशने जीवाच्या आकांताने स्वत:चा जीव वाचविण्यासाठी केलेला प्रयत्न शेवटी अपयशी ठरला. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

येतांना जरासुद्धा कल्पना नव्हती, की हा मित्रांसोबतचा शेवटचा प्रवास असेल. ग्रामस्थांनी वेळेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना कळविले. पुढील घटनेचा तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर व पोलीस कर्मचारी करीत आहे.

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - किशोरी वाघ

Web Title: Two Five Friends Who Went Swim Waterfall Drowned Nashik Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik
go to top