esakal | ऐन दिवाळीत देवळ्यात दोन गटांत हाणामारी; पोलिसांमुळे टळले पुढील विघ्न
sakal

बोलून बातमी शोधा

crime 111.png

पोलिसांनी गावातच तळ ठोकत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली. या घटनेत दंगेखोरांची नावे वाढू शकतात, उर्वरित तपास व गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांचे सुरु आहे. राजकिय सूडबुद्धीने दंगल घडविल्याचा प्रयत्न असल्याचा दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

ऐन दिवाळीत देवळ्यात दोन गटांत हाणामारी; पोलिसांमुळे टळले पुढील विघ्न

sakal_logo
By
गोपाळ शिंदे

घोटी (जि.नाशिक) : देवळे (ता. इगतपुरी) येथे दोन गटात सोमवार (ता. 16) रात्री दरम्यान तुंबळ हाणामारी झाली. घटनास्थळी वेळेत पोहोचलेल्या पोलिसांच्या धाडसीपणामुळे पुढील विघ्न टाळले गेले. यात आठ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

शाब्दिक बाचाबाचीचे रुपांतरण हाणामारीत

घटनेचे गांभीर्य पाहता सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी तातडीने दंगल नियंत्रण पथकास पाचारण केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली. सदर वादाची सुरवात सायंकाळ दरम्यान तरुणांच्या किरकोळ वादातून झाली. दुचाकीवर स्टंट करतांना पडलेल्या तरुणांना पाहून काही तरुण हसले, त्यातून शाब्दिक बाचाबाची होवून दंगेखोर गटाकडून घरांवर दगड फेक व चार दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. मंगळवार (ता. 17) सकाळी आठ वाजता पुन्हा एका गटाने दुचाकी फोडून नुकसान केले.

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग

राजकिय सूडबुद्धीने दंगल घडविल्याचा प्रयत्न

याबाबत पोलिसांनी गावातच तळ ठोकत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली. या घटनेत दंगेखोरांची नावे वाढू शकतात, उर्वरित तपास व गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांचे सुरु आहे. राजकिय सूडबुद्धीने दंगल घडविल्याचा प्रयत्न असल्याचा दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला

loading image