Nashik News : MHT- CET साठी अडीच लाख विद्यार्थ्यांची नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MHT CET

Nashik News : MHT- CET साठी अडीच लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

नाशिक : व्‍यावसायिक अभ्यासक्रमांना सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिला जाणार आहे. त्‍यासाठी राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ऑनलाइन अर्ज सुविधा उपलब्‍ध करून दिलेली आहे.

विविध सीईटी परीक्षांच्‍या नोंदणीला राज्‍यभरातून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी आत्तापर्यंत राज्‍यातून दोन लाख ५१ हजार ४१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी करून निर्धारित शुल्‍क भरलेले आहे. (Two half lakh students registered for MHT CET Nashik News)

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवेशासाठी सीईटी सेलतर्फे सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. आगामी शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरु होण्याच्‍या उद्देशाने नियोजन आखण्यात आलेले आहे. त्‍यानुसार काही अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे.

या प्रक्रियेस राज्‍यभरातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरताना परीक्षेसाठी निर्धारित शुल्‍कदेखील अदा करायचे आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे योग्‍य प्रकारे नियोजन करता यावे, यासाठी सीईटी परीक्षेच्‍या संभाव्‍य तारखांचीही माहिती जारी केलेली आहे.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र आणि बी. एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी होणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी तीन लाख ४५ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून, यापैकी दोन लाख ५१ हजार ४१७ विद्यार्थ्यांनी शुल्‍क भरून प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. उर्वरित ९४ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी शुल्‍क भरलेले नाही.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

सीईटी परीक्षांसाठी नोंदणी पूर्ण केलेल्या विद्यार्थी संख्या अशी-

एमबीए/एमएमएस सीईटी--------------१ लाख ३१ हजार ०३५

एमसीए सीईटी-------------------------३४ हजार २४६

फाईन आर्ट सीईटी--------------------३ हजार ०१८

बीए, बीएस्सी.बी.एड. सीईटी-----------१ हजार ४१०

एलएलबी (५ वर्षे) सीईटी-------------२० हजार २७६

एलएलबी (३ वर्षे) सीईटी-------------२१ हजार ३४९

बी.एड. सीईटी-------------------------६४ हजार ७९४

सीईटी परीक्षांच्‍या नोंदणीची मुदत अशी-

फाईन आर्ट सीईटी--------------------२४ मार्च

एलएलबी (५ वर्षे) सीईटी-------------२३ मार्च

एलएलबी (३ वर्षे) सीईटी-------------२५ मार्च

बी.एड. सीईटी-------------------------२३ मार्च

एमएचटी-सीईटी---------------------७ एप्रिल

टॅग्स :NashikeducationMHT CET