Nashik News : सिन्नरमध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा कुंदेवाडी बंधाऱ्यात बुडून मृत्यू; कुटुंबियांवर शोककळा

Nashik News : दरम्यान एका मुलाचा मृतदेह शोधण्यात यश आले असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
Two minors died after drowning in Kundewadi
Two minors died after drowning in Kundewadi

उन्हात काहीली चांगलीच वाढली आहे. पावसाची साऱ्यांना प्रतीक्षा आहे. अशावेळी पाण्यात डुबण्याचा मोह बऱ्याच जणांना होतो. पण, पाण्यात डुबताना काही काळजी घ्यावी लागते. अन्यथा होत्याचे नव्हते होते. अशीच एक घटना सिन्नर शहरातील कुंदेवाडी गावातील बंधाऱ्यात घडली. सिन्नर शहरातील आंबेडकर नगर येथील चार मित्र बंधाऱ्यावर गेले. बंधाऱ्यावर पाणी वाहते नसून ते साठलेले आहे. या बंधाऱ्यात त्यात दोन जण सापडले. यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीयांना धक्का बसला. गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या पुढे कुंदेवाडी बंधारा येथे ही घटना घडली.

Two minors died after drowning in Kundewadi
Dombivli MIDC Blast : एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट, परिसर हादरला, कित्येक जण जखमी | Video Viral

आंबेडकर नगर येथे घटनेची माहिती समजताच तेथील तरुणांनी कुंदेवाडी येथे बंधारा येथे जात एकाला बाहेर काढले असता दुसऱ्याचा शोध सुरू होता. त्यानंतर काही वेळाने दुसऱ्याचा शोध लागल्याने त्यांना पाण्यातून बाहेर काढले. तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. या ठिकाणी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी हे उपस्थित होते.

चार युवक अंघोळीसाठी गेले होते. यातील दोन युवक सार्थक काळु जाधव आणि अमित संजय जाधव हे दोघे पाण्याच्या कपारीत सापडले. त्यानंतर त्यांना बाहेर निघणे मुश्किल झाले. तात्काळ ही घटना समजताच. तेथील तरुणांनी बंधाऱ्यात उड्या घेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण दोघांनाही वाचवण्यात यश आले नाही.

बराच वेळ पाण्यात राहिल्यामुळे ते मृत पावल्याचे प्राथमिक अंदाज समजते. उत्तर तपासणीसाठी त्यांचे मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले असून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवासी जाधव यांच्या कुटुंबाला मोठा दुःखाचा प्रसंग ओढवला आहे.

Two minors died after drowning in Kundewadi
Dombivli MIDC Blast Live Update: डोंबिवलीतील स्फोटात सहा मृत्यू तर ३८ जण रुग्णालयात दाखल - देवेंद्र फडणवीस

सार्थक जाधव हा घरात मोठा असून त्याला एक भाऊ आहे. तर वडील आता मागील काही दिवसांपूर्वी वारले आहेत. तर आमित संजय जाधव हा एकुलता एक असल्याने त्याला बहीण आहे. तरुणांनी आत्ताच दहावीची परीक्षा दिल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबांसह डॉक्टर आंबेडकर येथील रहिवासी यांच्यावर शोककळा पसरली.

Two minors died after drowning in Kundewadi
Dombivli MIDC Blast: डोंबिवलीतील केमिकल कंपनी भीषण स्फोटाने प्रोबेस स्फोटाच्या आठवणी झाल्या ताज्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com