Municipal Corporation News : पावणेसहा कोटीची थकबाकी वसुली

Nashik Municipal Corporation News
Nashik Municipal Corporation Newsesakal

नाशिक : थकबाकी वसुलीसाठी महापालिकेच्या विविध कर विभागाने २०३७ नळ जोडण्या तोडल्या. नोटीस बजावण्यात आलेल्या नळ धारकांकडून जवळपास पावणेसहा कोटी रुपयांची थकबाकी वसुली केली.

यंदाच्या आर्थिक वर्षासाठी विविध कर विभागाला पाणीपट्टी वसुलीचे ७५ कोटी रुपयांची उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३५ कोटी रुपये वसूल झाले. (Two Thousand thirty eight tap connections secured by various tax departments of Municipal Corporation for recovery of arrears Nashik News)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Nashik Municipal Corporation News
Nashik News : विनयनगरच्या वादग्रस्त भूखंडावरील अतिक्रमण हटविणार

आर्थिक वर्ष अखेरीचा मार्च महिना येत असताना पाणीपट्टी पूर्ण क्षमेतेने वसूल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याअनुषंगाने सर्वप्रथम थकबाकीदारांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

पहिल्या टप्प्यात नऊ कोटी रुपये थकबाकी वसूल करण्यासाठी १६२१ नळ जोडणी धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या. १ ते १९ जानेवारी दरम्यान यातील १३८४ थकबाकीदारांनी पहिल्या टप्प्यात पाच कोटी ७४ लाख रुपये थकबाकी जमा केली.

तर २३७ थकबाकीदारांनी नोटिशीला प्रतिसाद न दिल्याने त्यांचे नळ जोडण्या तोडण्यात आल्या. पूर्व व पंचवटी विभागात प्रत्येकी २५ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. सिडको विभागात ७९, सातपूर विभागात ९६, तर नाशिक रोड विभागात १२ नळ जोडण्या जोडण्यात आल्या.

Nashik Municipal Corporation News
Jalgaon News : भूषण शेवरेच्या खुनातील दोन संशयितांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com