जुने नाशिक : रिक्षात प्रवासाचा बहाणा करत चोरी करणाऱ्या 2 महिलांना अटक | latest theif news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

theif

रिक्षात प्रवासाचा बहाणा करत चोरी करणाऱ्या 2 महिलांना अटक

जुने नाशिक : रिक्षा प्रवासाचा बहाणा करून प्रवासी महिलांच्या पर्समधून सोन्याचे दागिने, रोकड चोरी करणाऱ्या दोन महिलांना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रिक्षात एकट्या प्रवासी महिलेस बघून दोन महिला लहान मुलासह रिक्षात बसतं. काही अंतरानंतर मुलास रडण्यास लावून प्रवासी महिलेकडे पाण्याची मागणी करीत होत्या. त्यादरम्यान नजर चुकवून संशयित महिला दुसऱ्या महिलांच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास करीत होत्या. सिडकोतील प्राजक्ता सोनजे ४ सप्टेंबर २०२१ ला मुंबई नाका येथून सिडकोकडे जात असताना, संशयित महिलांनी त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोकड, असा सुमारे २४ हजार ९६५ रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यांच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा: अकाेला : सतरा लाखांची लुट, चार आरोपी जेरबंद

काठे गल्लीतील भारती गांगुर्डे द्वारका येथून शालिमारकडे रिक्षातून प्रवास करीत असताना, संशयित महिलांनी त्यांच्या पर्समधील ५० हजारांची चोरी केली होती. त्यांच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मुंबई नाका गुन्हेशोध पथक शनिवारी (ता. ७) मुंबई नाका बसस्थानक परिसरात गस्त घालत असताना, दोन संशयित महिला आढळून आल्या. चौकशीसाठी लहान मुलासह त्या दोघींना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरी करण्याची पद्धत सांगितली. पोलिसांनी तक्रारदार दोन्ही महिलांना बोलावून खात्री केली. त्यांनी संशयित महिलांना ओळखले. लक्ष्मी व्यंकटेश गाजवा (वय ३५), भाग्या राजू गाजवा (३८, दोन्ही रा. आळेफाटा जुन्नर, पुणे), तसेच चार वर्षांचा मुलगा असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील राहोकले, निरीक्षक चंद्रकांत अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा: चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा अवघ्या 24 तासांत लावला शोध

Web Title: Two Women Arrested For Stealing From A Rickshaw In Nashik Thief News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikcrimewomenthief
go to top