Nashik NCP News: राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षपदी उदयकुमार आहेरांची नियुक्ती

Udaykumar Aher
Udaykumar Aheresakal

Nashik NCP News : शिवसंग्राम संघटनेतून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केलेले उदयकुमार आहेर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

त्यांच्यासोबत प्रवेश केलेल्या चार पदाधिकाऱ्यांना राज्य कार्यकारिणीत स्थान देण्यात आले असून त्यांना तसे नियुक्तीचे पत्र देण्यात आली आहेत. (Uday Kumar Aher appointed as NCP Regional Vice President Nashik political News)

(स्व.) विनायक मेटे यांच्या निधनानंतर तब्बल वर्षभरानंतर उदयकुमार आहेर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील सुमारे २२ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यामध्ये नाशिकसह पुणे, लातूर, अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, नागपूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पालघर, वर्धा, वाशिम, बीड आदी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Udaykumar Aher
NCP: शरद पवारांनी सेनापती गमावला? एका खासदाराचे आणि आमदाराचे अजित पवारांना समर्थन?

या पदाधिकाऱ्यांमधून अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उदयकुमार आहेर यांना राज्याच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवितानाच त्यांच्यासोबत आर्किटेक्ट वैशाली जवंजाळ यांना प्रदेश महिला सरचिटणीस तर नंदुरबारचे संतोष मराठे आणि बुलढाणा जिल्ह्यातील पंजाबराव देशमुख यांना प्रदेश चिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे.

आगामी काळात मराठा आरक्षण, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक या दोन प्रमुख विषयांसोबतच कसमादे व खानदेशसाठी उपयुक्त असणाऱ्या वरदान ठरणाऱ्या मांजरपाडा दोन या प्रकल्पासाठी तसेच शेतकरी कष्टकरी युवक महिला अल्पसंख्यांक यांच्यासाठी काम करणार असल्याचे श्री. आहेर यांनी सांगितले.

Udaykumar Aher
Nashik NCP News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नाशिक जिल्हा प्रभारीपदी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com