

Uddhav Thackeray Matoshree Meeting nashik nagarsevak
esakal
Nashik Corporators Shiv Sena : नाशिक महापालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगरसेवकांच्या कथित फुटीच्या चर्चांमुळे निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट हस्तक्षेप करत नाशिकमधील सर्व नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना बुधवारी (ता. १५) दुपारी मुंबईतील 'मातोश्री'वर उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
या बैठकीत नाशिकमधील पक्षस्थितीचा आढावा घेत नगरसेवकांची भूमिका जाणून घेण्याबरोबरच पक्षनिष्ठेबाबत स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.