Water Crisis : संभाजीनगरला 2 वर्षांपासून पाणीकपात; रहिवासी त्रस्त

water crisis news
water crisis newsesakal

पंचवटी (जि. नाशिक) : संभाजीनगर परिसरात गेल्या दीड- दोन वर्षांपासून अनधिकृत पाणी कपात सुरू आहे.

पाणी पुरवठ्याच्या निश्चित वेळेपेक्षा कमी वेळ पाणीपुरवठा (Water Supply) होत असल्याने या परिसरातील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. (Unauthorized water cuts have been going on in Sambhaji Nagar area for last one and half to 2 years nashik news)

धरणात मुबलक पाणी असताना शहरातील इतर भागात पुरेसा पाणीपुरवठा होत असताना याच परिसराला पाण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. या अनधिकृत पाणी कपातीने रहिवासी त्रस्त झालेले आहेत.

संभाजीनगर परिसरात सकाळी साडेसात ते साडेनऊ अशी दोन तास पाणीपुरवठ्याची व्यवस्था आहे. असे असताना पावणेआठच्या सुमारास पाणी येते आणि साडेआठनंतर बंद होते. इतर भागात दीड ते दोन तास पाण्याचा पुरवठा होत असताना या लोकवस्तीच्या भागालाच पाण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे.

या लोकवस्तीच्या बाहेरून १२ इंच व्यासाची पाइपलाइन टाकण्यात आली. त्यानंतर ही पाणी कपात सुरू झाली. पाणीपुरवठा कमी वेळ होत असल्याच्या अनेक तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या. अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन विनंती करण्यात आली तरीही ही समस्या सुटली नाही.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

water crisis news
NMC News : नाशिककरांवरील पाणीपट्टी दरवाढ टळली! 27 फेब्रुवारीला सादर होणार अंदाजपत्रक

पुरेसे पाणी मिळत नसल्याने येथील रहिवाशांना टँकरने पाणी मागविण्याची वेळ येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची गरज वाढत असल्याने ही परिस्थिती आणखीच गंभीर होते. पूर्वी या परिसरात सकाळी व सायंकाळी या दोन्ही वेळी दीड तास पाणीपुरवठा होत होता.

मात्र, गेल्या दहा वर्षांपासून केवळ एकच वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. येथील तक्रारी वाढल्यानंतर पाणीपुरवठ्याची वेळ दोन तासांची करण्यात आली. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून पुन्हा अनधिकृत पाणी कपात सुरू झाली.

"नाशिक महापालिकेचे तक्रारीचे ॲप बंद आहे. त्यामुळे ऑनलाइन तक्रार करता येत नाही. अधिकारी प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे देतात. संभाजीनगर परिसरात बोरगड टाकीवरून होणारा पाणीपुरवठा पुर्ववत करावा आणि येथील रहिवाशांचे होणार हाल थांबावेत." - दिलीप सांगळे, ज्येष्ठ नागरिक, संभाजीनगर.

water crisis news
Shiv Jayanti 2023: सातासमुद्रापार रशियात शिवजयंती साजरी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com