#Lockdown : 'क्वारंटाइन व्यक्तींचं ट्रॅकिंगही डिजिटली करता येणार?'...महापालिका प्रशासनाचं 'क्वारंटाइन'वर लक्ष

radhakrushn game.jpg
radhakrushn game.jpg
Updated on

नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासह "लॉकडाउन'च्या काळात होणारी गर्दी टाळण्यासाठी नाशिक महापालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत "डिजिटल रणनीती' तयार केली आहे. यात "नाशिक बाजार' ऍप, "एनएमसी कोवीड- 19' ऍप व प्रशासनासाठी "महाकवच' ऍपचा त्यात समावेश असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. 

अ‍ॅप महापालिकेच्या http://www.nmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध

आयुक्त गमे म्हणाले, की किराणा दुकानांत होणारी गर्दी थांबावी, लोकांना घरपोच माल मिळावा, यासाठी नाशिक महापालिका व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ऍन्ड ऍग्रिकल्चर यांच्यातर्फे अल्टालिएंट इन्प्फोटेक ने "नाशिक बाजार' हे अ‍ॅप तयार केले असून, ते सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे. या ऍपमध्ये नाशिकमधील किराणा दुकानदारांनी व नागरिकांनी नोंदणी करून त्यावर आपल्या मालाची मागणी नोंदविल्या वर त्या भागातील दुकानदार आपली ऑर्डर नोंदवून मालाची घरपोच डिलिव्हरी करतील. हे अ‍ॅप नाशिक महापालिकेच्या www.nmc.gov.in या संकेतस्थळावर Nashik Bazzar या नावाने उपलब्ध आहे. 

सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) यावर भर

लिंक https://nashikcorporation.in/images& 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक महापालिका विविध उपाययोजना करीत असताना सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) यावर भर दिला जात असून, या हेतूने महापालिकेने NMC COVID-19 हे ऍप कार्यान्वित केले आहे. ज्याच्या मदतीने शहरातील सरकारी दवाखान्यांची यादी, थेट डॉक्‍टरांशी संपर्क, न्यूज फिडस, अन्नदान/देणगीदार, दैनिक आवश्‍यक वस्तू, निवारा शेड, कोविड-19 ची अद्ययावत माहिती थेट मोबाईलद्वारे आपल्याला तत्काळ मिळू शकेल. हे ऍप महापालिकेच्या http://www. nmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  लिंक https://nashikcorporation. in/images/NMCCOVID19_android/NMC_COVID-19_v1_6.apk. 

प्रशासनासाठी "महाकवच' अ‍ॅप

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी "महाकवच' ऍप तयार केले आहे. यात कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग व क्वारंटाइन ट्रॅकिंगचा समावेश आहे. कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग म्हणजे कोरोनाबाधित व्यक्ती ही अन्य कोणाच्या संपर्कात आली होती का, याचं ट्रेसिंग. महाकवच ऍप इनस्टॉल केलं जाईल तेव्हा अशा व्यक्तींचं क्वारंटाइन ट्रॅकिंगही डिजिटली करता येणार आहे. याची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जिओ फेन्सिंग व सेल्फी अटेंडन्स. अशा व्यक्तींना एका मर्यादित त्रिज्येतच वावरण्याची मुभा असेल. जेव्हा ही त्रिज्या ओलांडली जाईल तेव्हा ऍपद्वारे ही माहिती प्रशासनाला समजेल, असेही श्री. गमे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com