धार्मिक पर्यटनात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कौतुकास्पद - राज्यपाल

bhagat singh koshyari
bhagat singh koshyariSakal media

घोटी (जि. नाशिक) : शाश्वत शेती व समृद्ध शेतकरी यांसह शेती पूरक व्यवसायात महाराष्ट्र राज्य हे पूढे आहे. राज्यातील धार्मिक ,पर्यटन क्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ रोवून शेतीकडे वळणाऱ्या युवा पिढीला सलाम करावासा वाटतो. सर्वसामान्य शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करतो मात्र अवकाळी पाऊसामुळे शेतकरी मेटाकुटीला येतो. नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक कृषी उत्पन्न वाढवुन शेतकऱ्यांना फायदा कसा होईल याकडे लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे प्रतिपादन महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशियार (Bhagat Singh Koshyari) यांनी व्यक्त केले. वैतरणा- त्र्यंबकेश्वर महामार्गावरील हळदी प्लांटला रविवारी ( ता. ३० ) राज्यपाल कोशियार यांनी भेट दिली त्या प्रसंगी ते बोलत होते.

अत्यंत कमी क्षेत्रावर जास्तीचे उत्पादन घेऊन लागवड खर्च कमी करण्यासाठी इस्त्राराईल पद्धतीने राज्यात २७ ठिकाणी ऍग्री एक्वा लॅप या कंपनीने प्लांट सुरू केले आहे. कमी क्षेत्रातील शेतकऱ्यांना देखील यातून मोठा फायदा होणार असून एकदाच केलेली डेव्हलपमेंट मटेरियल तब्बल ७० वर्षापर्यंत कामी पडू शकते असा विश्वास आहे अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत झाडे यांनी दिली.

एग्री एक्वा लॅप कंपनीच्या संपूर्ण पीक पद्धतीसह मत्स्यपालन, हळद उत्पादन, बागायती पिके यांची बारकाईने निरीक्षण करून कृषी अधिकारी यांच्याकडून राज्यपाल महामहिम यांनी माहिती समजून घेतली. इस्त्राराईल धर्तीवर केलेल्या शेती तंत्रज्ञान विकसित पद्धतीचा वापर राज्यात इतर जिल्ह्यांकरता या दृष्टीने विचार केला जाईल असा विश्वास त्यांनी संबंधित अधिकारी यांना दिला. राज्यातील राजकीय घमासान पद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आल्यावर त्यांनी उत्तर देणे टाळले.

bhagat singh koshyari
नाशिक : महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन

राज्यपाल महामहिम यांचा घोटी दौरा ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगने, विभागीय अधिकारी डॉ.अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, श्रद्धा गंधास, अनिल पवार, वसंत पथवे, उपनिरीक्षक संजय कवडे यांसह जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबई-नाशिक महामार्ग तसेच सिन्नर-घोटी मार्गावर जागोजागी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, राज्यपाल प्रबंधक राकेश नतानी, परिसहाय्यक राजेंद्र सिंग, विशेष अधिकारी उमेश कासिकर कृषी अभ्यासक डॉ. प्रशांत झाडे, डॉ. हिरेन पटेल, रोहित लोणकर, डॉ.साईनाथ हाडोळे, तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर उपस्थित होते.

bhagat singh koshyari
कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढीचा फरक मिळण्यासाठी 'तारीख पे तारीख'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com