Nashik News: बागलाण तालुक्यातील आरोग्य विभागात रिक्त पदे; केंद्र सरकारच्या योजनेत तालुका तरीही अव्वल!

Ambasan Primary Health Care Centre
Ambasan Primary Health Care Centreesakal

अंबासन, (जि.नाशिक) : तालुक्यात आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे अनेक उपकेंद्र ओस पडल्याच्या मार्गावर रिक्त जागांवर अतिरिक्त भार कर्मचाऱ्यांवर सोसवत नसल्याने बहुतांश ठिकाणांहून रुग्णांच्या नातेवाईकांचा रोष कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत असून आरोग्य विभागाने दखल घेऊन तातडीने रिक्त पद भरण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.

दरम्यान रिक्त पदे असतांनाही शासनाने सुरू केलेल्या आभा व आयुष्यमान गोल्डन कार्ड योजनेंतर्गत जिल्ह्यात अव्वल असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. (Vacancies in Health Department in Baglan Taluka still top in central government plan Nashik News)

  बागलाण तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा सलाईनवर असून कर्मचाऱ्यांवर अतिरिक्तचा भार पदरी पडला आहे.

आदिवासीबहुल भागातील अलियाबाद, कपालेश्वर, केळझर, मुल्हेर व साल्हेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर बिगर आदिवासीबहुल भागातील अंबासन, ब्राह्मणगाव, जायखेडा, निरपुर, ताहराबाद, विरगाव तसेच तालुका आधिकारी कार्यालयातील जागा रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

दरम्यान बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक महिन्यांपासून औषध निर्माण आधिकारी नसल्याने रूग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे.

रिक्त पदे भरण्यात यावी म्हणून आरोग्य विभागाकडून तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करीत आहेत. पंचायत समिती बागलाण आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ४५ परिचर मंजुर पदे असून यात १५ परिचर भरलेली असून ३० पदे रिक्त आहेत.

Ambasan Primary Health Care Centre
YCMOU News: राज्यपालांच्या दौऱ्यामुळे मुक्त विद्यापीठ रस्त्याची मलमपट्टी! दौऱ्यामुळे तात्पुरता दिलासा

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी अशिमा मित्तल यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. दरम्यान आजमितीस केंद्र सरकारकडून आभा कार्ड तसेच आयुष्यमान गोल्डन कार्ड योजनेंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य विभाग व्यस्त असून आशा प्रवर्तकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे.

बागलाण तालुक्यात बहुतांश भागातील रिक्त पदे असतानादेखील तालुका वैद्यकीय आधिका-यांसह कर्मचाऱ्यांनी १३०१६ लाभार्थ्यांचे आयुष्यमान गोल्डन कार्ड योजनेत नाव नोंदवून जिल्ह्यात अव्वल स्थानावर झेप घेतली असून मुख्य कार्यकारी आधिकारी अशिमा मित्तल व आरोग्य विभागाकडून कौतुकाची थाप दिली आहे.

"बागलाण तालुक्यातील आरोग्य विभागात बरेच पदे रिक्त असून अश्याच परिस्थितीत सर्व अधिकारी व कर्मचारी कामकाज करीत आहेत. एवढे रिक्त पद असून सुद्धा तालुक्यातील आरोग्य सेवा देण्यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई केली जात नसून वेळीच सर्व आरोग्य सेवा आणि आरोग्य विषयक निर्देशांक कर्मचारी पूर्ण करत आहेत. मागील सहा महिन्यात राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे कामकाज १२३० (६१%) एवढे झाले असून सध्या सुरु असलेल्या गोल्डन कार्ड इ-KYC कामकाजात सर्व कर्मचारी खूप मेहनत घेत असून बागलाण तालुका संपूर्ण जिल्ह्यात दररोज सर्वात जास्त नोंदणीचे काम करीत आहे. मागील १० दिवसात बागलाण तालुक्यातील १३,०१६ लाभार्थींचे आयुष्मान गोल्डन कार्ड साठी इ-kyc नोंदणी करण्यात आली आहे."-  हर्षलकुमार महाजन, तालुका वैद्यकीय आधिकारी बागलाण

Ambasan Primary Health Care Centre
Nashik: डायल 112 वर फेक कॉल करत असाल तर खबरदार! चुकीची माहिती देत पोलिसांची फसवणूक; गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com