Nashik News: निफाड उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा वाणवा! व्हेंटिलेटरअभावी सर्पदंश झालेल्या रुग्णाची हेळसांड

hospital ventilators file photo
hospital ventilators file photoesakal

Nashik News : येथील उपजिल्हा दर्जाचे रुग्णालयात विविध सोयी-सुविधांचे लोकार्पण गेल्या वर्षभरात अनेक वेळा झाले. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार दिलीप बनकर यांच्या उपस्थितीतही ऑक्सिजन प्लांटचे उद्‌घाटनही झाले आहे.

मात्र, याच उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंश झालेल्या रुग्णावर उपचार करताना त्याची आँक्सिजन पातळी खालावल्याने थेट इतरत्र हलविण्याचा सल्ला दिल्याने दिमाखात उद्‌घाटन झालेल्या सुविधांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Variety of facilities in Niphad Upazila Hospital Heels of snakebite patient without ventilator Nashik New)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

निफाड तालुक्यातील रौळस येथील योगेश कैलास शिंदे १३ सप्टेंबरला दुपारी बाराला वीजपंप सुरू करण्यासाठी गेला होता. त्यास सर्पदंश झाल्याने निफाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय पथकाने उपचार सुरू केले.

मात्र, उपचारादरम्यान रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी होत असल्याने उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी अधिक उपचार करण्यासाठी व्हॅन्टिलेटर उपलब्ध नाही, असे सांगून रुग्णास तत्काळ ऑक्सिजन द्यावा लागणार असल्याने त्वरित पर्याय काढा, असे सांगितले होते.

त्यामुळे पालक व मित्रपरिवाराने तत्काळ त्यास निफाड शहरातील खासगी रुग्णालयात हलविले. त्यामुळे त्यास जीवदान मिळाले. त्यापोटी खासगी रुग्णालयत उपचारासाठी खर्च लाखाच्या आसपास गेल्याने कुटुंब हतबल झाले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

hospital ventilators file photo
Nashik News: आभासी जगतातील मित्रांचा मेळा यंदा सांगोल्यात! भेटीगाठी खाद्य संस्कृतीसह मनोरंजनाचा खजिना

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात योगेश वडीलांसह राहतो. जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातील योगेशवर आलेली वेळ अत्यंत दुर्दैवी असल्याने कुटुंबासह मित्रपरिवार हतबल झाला आहे .

"योगेशचे कुटुंब मोलमजुरी करणारे आहे. ‌निफाड उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिज‌न प्लांटचे दिमाखात उदघाटन करणारे लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का ?"

-माणिकराव शिंदे , माजी संचालक, बाजार समिती पिंपळगाव

"निफाड उपजिल्हा रुग्णालयात आयसीयु युनिट सुरू नाही. वैद्यकीय सेवेसाठी पूर्णवेळ दोन फिजिशनची आवश्यकता आहे. रुग्णास सर्पदंश झाला होता. ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने रुग्णाच्या जीवितास धोका असल्याने त्वरित व्हॅन्टिलेटर उपलब्ध असलेल्या ठिकाणी दाखल‌ करून उपचाराचा वैद्यकीय सल्ला दिला."

-डाॅ. आर. एस. तांभाळे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय निफाड

hospital ventilators file photo
Nashik Damage Road: खड्ड्यांमुळे 3 दिवसांत अनेक अपघात; दुचाकीसह वाहनांचे नुकसान, चालक त्रस्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com