"शिवसेना माझ्यासाठी आईसमान'; मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर गितेंची स्पष्टोक्ती 

vasant gite mns 1.jpg
vasant gite mns 1.jpg

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते शिवसेनेत जाण्यावर जवळजवळ निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी गिते यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत पक्षात परतण्याचे आवतन दिले. परंतु पक्षाला चांगले दिवस आणल्यानंतर भविष्यात स्पर्धक निर्माण होईल, अशी भीती निर्माण झाल्याने राज ठाकरे यांना चुकीची माहिती देऊन मला पक्षातून जाण्यास ज्यांनी भाग पाडले, त्या बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई व अविनाश अभ्यंकर यांच्याबरोबर पुन्हा काम करावे का? असा उलट सवाल करत गिते यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना संभ्रमात पाडताना शिवसेना माझ्यासाठी आई असल्याचे सांगत शिवसेनेत प्रवेश करण्याचे संकेत दिले. 

नांदगावकर, सरदेसाई, अभ्यंकर यांचा अडसर 
नववर्षाच्या सुरवातीला गिते यांनी मिसळ पार्टी घेऊन राजकीय बदल होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यादृष्टीने काही संकेतदेखील मिळत असून, शिवसेनेचे खासदार संजय राऊत गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येणार असून, त्यात गिते व सुनील बागूल यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. गिते यांना मनसेत घेण्यासाठी एक मोठा गट कार्यरत असून, सध्याच्या नेतृत्वावर टीका करताना पक्षाला जीवदान द्यायचे असेल, तर कार्यकर्त्यांचे मोहोळ असलेले व मदतीला धावून जाणारे गिते हेच पक्षात हवे अशी भूमिका घेत दोन दिवसांपूर्वी गिते यांना नाशिक व नाशिक रोड येथील पदाधिकारी मुंबई नाका येथील निवासस्थानी भेटण्यास गेले होते. शिवसेनेत जाऊन काय करणार, तेथे नेत्यांची मोठी फळी आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर गितेंची स्पष्टोक्ती 

पदाधिकाऱ्यांच्या गर्दीत नेतृत्वाला वाव मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यापेक्षा मनसेला नाशिकमध्ये आपण मोठे केले आहे. निवडणुकीत १२२ तिकिटांचे वाटप आपल्या हाती राहणार असल्याने मनसेत यावे, अशी गळ टाकण्यात आली. गिते यांनी मनसेत प्रवेश न केल्यास त्यांना भेटलेल्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम वरिष्ठांकडून होईल, अशी भीती व्यक्त करत नाव न सांगण्याच्या अटीवर मनसे पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. 

हेही वाचा > निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड 

पुन्हा पुनरावृत्ती होऊ द्यायची का? 
नाशिकमध्ये मनसे पक्ष मोठा केला. तीन आमदार, महापालिकेत सत्ता आणली. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये सदस्य निवडून आणले. राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक वेगाने मनसे फैलावत असताना राज्य पातळीवरील काही नेत्यांना ते सहन झाले नाही. त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे चुकीची माहिती पोहोचवून त्यांनी मला पक्षातून बाहेर पडण्यास भाग पडले. आता पुन्हा मनसेला नव्याने उभे केल्यानंतर त्याची पुनरावृत्ती होवू द्यायची का, असा सवाल गिते यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com