आठवडे बाजारावरच निर्बंध का? भाजी विक्रेत्यांचा सवाल

vegetable sellers
vegetable sellers Google

पंचवटी (नाशिक) : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिका प्रशासनाने बुधवारच्या आठवडे बाजाराला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे येथील अनेक व्यावसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. एकीकडे रविवार पेठेसह अन्य बाजाराला परवानगी दिली जाते, पण हातावर पोट असलेल्या भाजी विक्रेत्यांवरच बंधन का, असा सवाल या विक्रेत्यांनी विचारला आहे. (Vegetable sellers demand permission for weekly market nashik lockdown update)

मार्च ते मे दरम्यान शहरासह जिल्ह्यात कोरोनाने हाहाःकार उडवला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लादत लॉकडाउन केले होते. त्यामुळे सर्वच प्रकारचे व्यवसाय ठप्प होते, परंतु जून महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने हळूहळू बंदच निर्बंध शिथिल करण्यात आले होते. त्यामुळे व्यावसायिकांना सकाळी सातपासून दुपारी चारपर्यंत व्यवसाय करण्यास मुभा मिळाल्याने काही प्रमाणात का होईना, अर्थचक्रास गती मिळाली. मागील आठवड्यातील बुधवारी मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हा बाजार उठविला होता. त्यामुळे उद्याच्या (ता.१४) आठवडे बाजाराबाबतही विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु, गंगाघाटावर दर बुधवारी भरणाऱ्या आठवडे बाजारावर अद्यापही निर्बंध आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या अनेक भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातील काही व्यावसायिकांनी जे काम मिळेल, त्यावर समाधान मानत उपजीविका सुरू ठेवली आहे, तर काही व्यावसायिकांनी चारचाकी हातगाडीवर व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे किमान आठवडे बाजाराला परवानगी मिळावी, अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

vegetable sellers
नाशिकवर पाणी कपातीचे ढग! गंगापूर धरणात ३४ टक्केच जलसाठा


उपनगरांतील बाजार पूर्ववत

शहरातील विविध भागात नियमित भाजीबाजार भरतो. पंचवटीतील कोनार्कनगर, श्रीरामनगर, जत्रा हॉटेल परिसर, म्हसरूळजवळील कन्सारामाता चौक, औरंगाबाद रस्त्यावरील निलगिरी बाग परिसरात नियमित बाजार भरतो. कोनार्कनगर परिसरात तर आठवड्यातून दोनवेळेस बाजार भरतो. याठिकाणी कोणतेही निर्बंध नाही, मग गंगाघाटावरील आठवडे बाजारावर निर्बंध का, असा सवाल या विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे.

बाहेरगावच्या विक्रेत्यांवर संक्रांत

गंगाघाटावर भरणाऱ्या आठवडे बाजारात केवळ भाजीपालाच नाही, तर तयार कपडे, धान्य व अन्य वस्तूंचीही विक्री होते. स्वस्तात वस्तू विक्रीला असल्याने दीनदुबळ्यांचा हा बाजार म्हणजे आधार आहे. याठिकाणी विक्रीसाठी घोटी, इगतपुरी, दिंडोरीसह परिसरातील खेड्यांतील शेतकरीही विक्रीसाठी येतात, परंतु बाजार बंदमुळे या सर्वांवर गंडांतर आले आहे.

(Vegetable sellers demand permission for weekly market nashik lockdown update)

vegetable sellers
मुंबई-नाशिक महामार्गाने प्रवास करणार असाल तर बातमी तुमच्यासाठी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com