esakal | लॉकडाउनमध्ये विस्कटला संसार! पती-पत्नीचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन घटस्फोट; जिल्ह्यातील असा प्रथमच निकाल
sakal

बोलून बातमी शोधा

Online.jpg

लॉकडाउनमुळे कामकाज बंदचा न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे. अशातच नाशिक येथील कौटुंबिक न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे जिल्ह्यातील लॉकडाउनमध्ये सुनावणी घेतांना सोमवारी (ता.१७) नाशिकच्या दाम्पत्याला परस्पर सहमतीने घटस्फोट मंजूर झाला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशा प्रकाराचा जिल्ह्यातील महत्वाचा निकाल ठरला.

लॉकडाउनमध्ये विस्कटला संसार! पती-पत्नीचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन घटस्फोट; जिल्ह्यातील असा प्रथमच निकाल

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक ः लॉकडाउनमुळे कामकाज बंदचा न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे. अशातच नाशिक येथील कौटुंबिक न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे जिल्ह्यातील लॉकडाउनमध्ये सुनावणी घेतांना सोमवारी (ता.१७) नाशिकच्या दाम्पत्याला परस्पर सहमतीने घटस्फोट मंजूर झाला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशा प्रकाराचा जिल्ह्यातील महत्वाचा निकाल ठरला.

नाशिकच्या कौटुंबिक न्यायालयात सुनावणी

कौंटुबिक न्यायालयाच्या न्यायाधीश शिल्पा तोडकर यांच्या न्यायालयात हा निर्णय झाला. या प्रकरणातील पतीने दुबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे नाशिकच्या कौटुंबिक न्यायालयात जबाब नोंदविला. तर पत्नी नाशिकचीच असल्याने या खटल्याची नाशिकच्या कौटुंबिक न्यायालयात सुनावणी झाली. त्यात घटस्फोटाचा अंतिम आदेशाचा निर्णय झाला. २०१८ मध्ये मुलगा-मुलगी दोघे नाशिकला राहत असल्याने त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांच्यात मतभेद सुरू झाले. पण दोन्ही बाजूच्या वकील व न्यायालयाने समुपदेशन करून प्रकरण मिटविले. त्यात दोन्ही बाजूने परस्परविरोधातील तक्रारी मागे घेतल्या.

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

ऑनलाईन  घटस्फोट मंजूर

गंगापूर पोलिस ठाण्यात पत्नीने पती विरुद्ध फौजदारी तक्रार केली होती. त्या खटल्याची मुंबई उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरसन्सींगद्वारे सुनावणी होऊन खटला रद्द झाला.फेब्रूवारी २० मध्ये दोघांनीही परस्पर संमतीने नाशिकच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यानुसार घटस्फोटासाठी प्रकरण दाखल झाले. कौटुंबिक न्यायालयाने सोमवारी  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुलाशी संपर्क साधून दोघांचेही म्हणणे ऐकून घेत, ऑनलाईन  घटस्फोट मंजूर केला. ॲड दीपक पाटोदकर व ॲड श्रीकांत मुंदडा यांनी कामकाजात भाग घेतला.

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

संपादन - ज्योती देवरे

loading image
go to top