Nashik News: मनमाड बसस्थानकाच्या भिंती झाल्या बोलक्या! आगारात लोकसहभागातून सुशोभीकरण

Painted walls in the bus station here.
Painted walls in the bus station here.esakal

मनमाड : पर्यावरण रक्षणासह प्लॅस्टिकला विरोध, स्वच्छता पंधरवाडा, स्वच्छतागृहांचा वापर, वन्यप्राणी संरक्षण, तसेच आरोग्य जनजागृती, स्वच्छ भारत मिशन यासह राज्यासह परिवहन महामंडळाच्या विविध योजनांची माहिती आणि परिसरातील ऐतिहासिक वास्तू अशा विविध संकल्प चित्राचे रेखाटन मनमाड बसस्थानक परिसरातील भिंतीवर करण्यात आल्याने या भिंती बोलक्या झाल्या आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या मनमाड बस आगारात लोकसहभागातून सुशोभीकरण करण्यात आल्यामुळे बस स्थानकाचा चेहरा मोहराच बदलला आहे. (walls of Manmad bus station became talkative Beautification through public participation in Agar Nashik News)

येथील बस स्थानकात रंगविण्यात आलेल्या भिंती.
येथील बस स्थानकात रंगविण्यात आलेल्या भिंती. esakal

मनमाड इंदौर-पुणे या राष्ट्रीय महामार्गावर असलेले मनमाड बस स्थानक हे राज्यात रस्ता वाहतुकीसाठी मध्यवर्ती आणि जंक्शन बस स्थानक आहे. त्यामुळे या बस स्थानकात अहोरात्र प्रवाशांची वर्दळ असते.

श्री क्षेत्र शिर्डी येथे दर्शनासाठी तसेच अजिंठा, वेरूळ, शनिशिंगणापूर, सप्तश्रृंगी गड आदी धार्मिक आणि पर्यटनासाठी देशभरातून नागरिक रेल्वेने मनमाडला येवून येथून मार्गस्थ होतात.

एसटीचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी लोकसहभागाच्या माध्यमातून बस स्थानकाचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्धार आणि बस स्थानक स्वच्छ व सुंदर ठेवण्याची संकल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आखली आहे.

या संकल्पनेला प्रतिसाद देत मनमाड बसस्थानकाने कात टाकली. बस स्थानकाचे लोकसहभागातून सुशोभीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत ऐतिहासिक, पर्यावरण, वन्य जीव संरक्षण, वसुंधरा असे विविध संदेश देणारे भित्तीचित्र बस स्थानकात रेखाटले आले असून स्थानकाच्या बोलक्या चित्राकडे प्रवाशांचे लक्ष वेधले गेले आहे.

Painted walls in the bus station here.
Nashik Unseasonal Rain Damage: अवकाळीग्रस्त शेतकऱ्याला 37 हजार 500 भरपाई; तहसीलदार बारवकर यांची तत्परता

विविध संकल्पनेवर आधारित राज्य शासनाने अलीकडेच जाहीर केलेली महिला सन्मान योजना याकडे ही लक्ष वेधले आहे.

बस स्थानक, स्वच्छता गृह, स्थानक परिसर, आगार प्रवेशद्वार बस आगारातील विविध कार्यालयातील प्रवेशद्वार, भिंती, मुख्य स्थानक आवार, यासह ठळक आणि मोठ्या अक्षरात मनमाड बसस्थानक हे नाव सेल्फी पाईंट, हिरकणी कक्ष आदी सर्व परिसर विविध घोषवाक्यांनी रंगून गेला आहे.

मनमाड जवळ आणि संपूर्ण राज्यातील पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या अनकाई आणि शेडींचा डोंगर याचे भित्तीचित्र लक्षवेधी ठरले आहे.

आगार प्रमुख अभिजित चौधरी यांच्या नेतृत्वात बस स्थानक व परिसर स्वच्छता सुशोभीकरण, रंगरंगोटी, नामफलक, वृक्षारोपण, प्रवासी निवारा शेड, व बस स्थानकाच्या भिंती यामुळे बोलक्या झाल्या आहे. त्यामुळे बस स्थानकात प्रवेश करताच प्रसन्न वातावरणाचा अनुभव प्रवाशांना येत आहे.

Painted walls in the bus station here.
Nashik News: सरपंच वैशाली पवार यांचे उपोषण कायम! अधिकार कायम ठेवत ग्रामसेविकेचा पदभार काढण्याचा प्रस्तावाला विरोध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com