Sakal Exclusive : महापालिकेच्या शाळांमध्ये वॉटर बेल; विद्यार्थ्यांना आजारापासून वाचविण्यासाठी उपक्रम

nmc water bell program
nmc water bell programesakal

Nashik News : शालेय वयातच विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय लागावी व त्यातून पाण्याच्या कमतरतेमुळे निर्माण होणारे आजार जडू नये यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षांपासून ‘वॉटर बेल’ उपक्रम राबविला जाणार आहे. दिवसातून तीन वेळा पाणी पिण्यासाठी बेल वाजविणे शाळांना बंधनकारक राहणार आहे. (water bell program will be implemented in municipal schools nashik news)

नाशिक महापालिका हद्दीत त्याप्रमाणे शाळांना सूचना दिल्या जाणार असून, उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांनादेखील तसे सूचित केले जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ‘सकाळ’ ला दिली.

सातत्याने पाणी पिण्याची सवय शरीराला पोषक असते. मात्र विद्यार्थ्यांकडून सातत्य नसते. घरी पालकांकडून लक्ष ठेवून पाणी पिण्यासाठी सूचना दिल्या जातात. परंतु शाळांमध्ये शिक्षकांकडून तेवढ्या प्रमाणात लक्ष देता येणे शक्य नाही.

त्यामुळे शालेय वेळेत दिवसातून तीन वेळा बेल वाजवून विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे पाणी पिण्यासाठी आठवण करून देण्यासाठी ‘वॉटर बेल’ उपक्रम या वर्षापासून प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

nmc water bell program
NMC News : महापालिकेकडून पावसाळा पूर्व कामांना गती; 323 मॅनहोलची दुरुस्ती

आवश्‍यक तेवढेच पाणी

नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये यापूर्वी विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी वॉटर बेल उपक्रम राबविण्यात आला, परंतु त्याचे उलट परिणामदेखील दिसून आले. वांरवार विद्यार्थ्यांना लघवी जावे लागल्याचा अनुभवदेखील शाळांचा आहे.

परंतु असे असले तरी पाणी पिण्याची सवय लागणे चांगले असल्याने वॉटर बेल उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविला जाणार आहे. परंतु सूचनेत बदल करताना विद्यार्थ्यांना आवश्‍यक तेवढेच पाणी पिण्याची सूचना केली जाणार आहे.

पाणी पिण्याचे फायदे

- शरीरातील अपोषक घटक लघवीद्वारे बाहेर.
- रक्ताभिसरण प्रक्रिया सुलभ होते.
- शरीराचे तापमान समतोल ठेवणे.

nmc water bell program
Sakal Exclusive : पहिल्या दिवसापासुनच कमी होणार दप्तराचे ओझे

पाणी कमी पिण्याचे तोटे

- युरिनरी इन्फेक्शन होणे.
- डिहायड्रेशन व चक्कर येणे.

"विद्यार्थ्यांनी सातत्याने पाणी प्यावे यासाठी उपक्रम स्तुत्य आहे. उत्तर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वॉटर बेल उपक्रम राबविण्यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल." - राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त.

"यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रभावीपणे वॉटर बेल उपक्रम राबविला जाणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर महापालिकेसह शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांना सूचनापत्र काढले जाणार आहे." - सुनीता धनगर, प्रशासनाधिकारी, शिक्षण विभाग, नाशिक महापालिका.

nmc water bell program
Nashik News: नामफलकांच्या आड नेमकं दडलंय काय? सामाजिक कार्यकर्ते निलेश चिखले यांच्यासह नागरिकांचा सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com