Water Tanker
Water Tankersakal

Water Management: राज्यात आठवड्यात 29 टँकरद्वारे पाणीपुरवठा वाढला; धरणांमध्ये 34.44 टक्के जलसाठा

Water Management : सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा अपवाद वगळता इतर जिल्ह्यातील २७० गावे आणि ६३९ वाड्यांसाठी २१३ टँकरद्वारे मागील आठवड्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु होता.

२ मेच्या तुलनेत टँकरची संख्या २९ ने वाढली. ३५ गावे आणि ३३ वाड्यांवर टँकर सुरु करावा लागला. गेल्यावर्षी ९ मेस २८१ गावे आणि ७३८ वाड्यांसाठी २७० टँकर धावत होते. (Water Management Water supply increased by 29 tankers in week in state 34 percent water storage in dams nashik news)

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे पोचल्याने घशाची कोरड वाढली आहे. त्यामुळे या आठवड्यात राज्यात आणखी टँकर सुरु करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

याशिवाय राज्यातील मोठे, मध्यम, लघू अशा एकूण ३ हजार ३ प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षी ३५.०७ टक्के जलसाठा होता. तो आज ३४.४४ टक्के इतका नोंदवला गेला. मोठ्या १३९ प्रकल्पांमधील जलसाठ्यात मोठी घसरण झाली आहे.

गेल्यावर्षी मोठ्या प्रकल्पांमध्ये ४०.४७ टक्के, तर आज ३५.७४ टक्के जलसाठा आहे. मध्यम २५९ प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षी ३१.५० टक्के, तर आज ३७.२७ टक्के जलसाठा आहे. लघू २ हजार ६०५ प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षी १७.७१ आणि आज २५.४८ टक्के जलसाठा आहे.

मध्यम आणि लघू प्रकल्पांमधील जलसाठ्याची स्थिती गेल्यावर्षीच्या तुलनेत आज अधिकची असल्याचे दिसते.

उन्हाळी पेरणी ५ टक्क्यांनी अधिक

गेल्यावर्षी राज्यात ३ लाख ९० हजार हेक्टरवर म्हणजेच १११ टक्के पेरणी उन्हाळी पिकांची झाली होती. साडेतीन लाख हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत यंदा ११६ टक्के म्हणजेच, ४ लाख ७ हजार हेक्टरवर उन्हाळी पिकांच्या आता पेरण्या झाल्या आहेत.

तृणधान्यांची १४१, कडधान्यांची ५५, तर गळीतधान्यांची ९० टक्के क्षेत्रावरील पेरणीचा त्यात समावेश आहे. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमुळे १ लाख ५१ हजार ७०४ हेक्टरवरील पिकांची नुकसान झाले आहे. त्यात मागील महिन्यातील १ लाख ४७ हजार ५९६, तर १ ते ४ मे या कालावधीतील ४ हजार १०८ हेक्टरचा समावेश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Water Tanker
Water Tanker : सहायक पोलीस निरीक्षकांकडून कोपरे, मांडवे, मुथाळणे परीसरात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू

कोकणात सर्वाधिक १०० टँकर

विभागाचे नाव गावे वाड्या टँकर

कोकण १४८ ४५१ १००

नाशिक ५५ ५९ ४९

पुणे ३२ १२५ २७

औरंगाबाद १८ ४ २०

अमरावती १७ ० १७

नागपूर ० ० ०

अमरावती विभागात अधिक जलसाठा (आकडे मोठे, मध्यम, लघू प्रकल्पाचे टक्क्यांमध्ये)

विभाग आजचा जलसाठा १३ मे २०२२ चा जलसाठा

अमरावती ४३.१२ ४०.४२

औरंगाबाद ३८.४० ३५.७६

कोकण ३९.६० ४३.९६

नागपूर ४१.२८ ३१.९४

नाशिक ३७.५४ ३१.०६

पुणे २५.२२ २७.२७

Water Tanker
Water Crisis: आदिवासी भागात पाण्यासाठी महिलांची पायपीट; इगतपुरी तालुक्यातील वाड्यापाड्यांवर मे महिन्यातच झळा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com