Nashik : आदिवासी भागातील 27 गावांचा पाणीप्रश्‍न मिटणार

water supply
water supplyesakal

पेठ (जि. नाशिक) : जलजीवन मिशनअंतर्गत (Jal Jeevan Mission) पेठ तालुक्यात २५ कोटी ५८ लाख रुपयांच्या नळ पाणीपुरवठा (Water Supply Scheme) योजना मंजुरी देण्यात आली असून तालुक्यातील २७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे नजिकच्या काळात सुटणार आहे. केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार () यांनी यासाठी पाठपुरावा करवून मंजुरी मिळविली. (Water problem of 27 villages in tribal areas will be solved Nashik Jal Jeevan Mission News)

केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील २७ गावांच्या २५ कोटी ५८ लाख ७५ हजार ४७५ रूपये रकमेच्या योजनांचे भूमिपूजन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.१७) दुपारी दोनला कोपुर्ली बु. येथे होणार असल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

पेठ हा आदिवासी बहुल तालुका आहे. अनेक गावात नळ पाणीपुरवठा योजना नसल्याने व जिथे ग्रामपंचायतीने तयार केलेल्या आहेत, त्यातून प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाण्या पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. हे जाणून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या प्रश्‍नाला प्राधान्य देत "हर घर जल" या जलजीवन मिशन योजनेंतर्गत २७ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने ५० टक्के वाटा उचलला आहे. पेठ तालुक्यासाठी केंद्र शासनाने २५ कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर केला असून या कामांचे आदेशही देण्यात आले आहेत. या योजनेत काही ठिकाणी नवीन विहीर, पाण्याची टाकी, नवीन पाईपलाईन, पाईपलाईन दुरुस्ती नळ जोडणी आदी कामांचा समावेश आहे.

water supply
नांदगावला भरदिवसा धाडसी चोरी

उर्वरीत गावांतही योजना प्रस्तावित
पेठ तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीसह त्याअंतर्गत येणाऱ्या वाडी वस्तीपर्यंत पाणीपुरवठा योजना राबवण्याचे उद्दिष्ट असून उर्वरित गावांची योजना प्रस्तावित आहे. मंजुरीनंतर तात्काळ शुभारंभ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पेठ तालुक्यातील या गावांचा समावेश
एकदरे, हनुमंतपाडा, कोपुर्ली बु., खोकरतळे, हातरुंडी, राजबारी, म्हसगण, विरमाळ, पाहुचीबारी, लिंगवणे, पिंपळपाडा, कुळवंडी, खिरकडे, जुनोठी, चाफ्याचापाडा, गांगोडबारी, उंबरपाडा (क), भायगाव, कुंभारबारी, इनामबारी, बाडगी, हरणगाव, नाचलोंढी, गोंदे, आसरबारी, वांगणी, पळशी, आमलोण.

water supply
वाहतूक कोंडीने कोंडला श्‍वास; मनमाडकरांना रोजच मन:स्ताप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com