Water Reservation : दारणा समूहातून 100 दशलक्ष घनफूट पाणी

darna dam
darna damesakal

Water Reservation : दक्षिण प्रशांत महासागरामध्ये ‘अल निनो’ वादळ निर्माण होऊन त्याचा परिणाम मॉन्सून लांबणीवर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणीकपातीच्या नियोजनावर फुली मारताना गंगापूर धरणात दोनशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले. त्याचबरोबर दारणा धरण समूहातूनदेखील शंभर दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या रेट्यामुळे विद्यमान सत्ताधाऱ्यांना पाणीकपात मागे घेताना तीनशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करावे लागल्याचा दावा महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. (Water Reservation 100 million cubic feet of water from Darna Group nashik news)

पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. ८) पाणीटंचाई आराखड्यासंदर्भात बैठक झाली. हवामान विभागाच्या सूचनेनुसार महापालिकेने पाणीकपात करण्याच्या नियोजनासंदर्भात या वेळी चर्चा झाली.

बैठकीत पालकमंत्री भुसे यांनी नाशिककरांना दिलासा दिला. गंगापूर धरणातून पाच हजार आठशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित आहे. त्या व्यतिरिक्त एकलहरे थर्मल पॉवर स्टेशनला दिले जाणाऱ्या दोनशे दशलक्ष घनफूट पाणीदेखील नाशिक शहरा च्या पिण्यासाठी आरक्षित करण्याच्या सूचना श्री. भुसे यांनी दिल्या.

एकलहरे थर्मल पॉवर स्टेशनच्या माध्यमातून गोदावरी नदीतून थेट पाणी उचलले जाते. त्यामुळे हे आरक्षण देण्यात आले. तर दारणा धरण समूहातूनदेखील शंभर दशलक्ष घनफूट पाणी नाशिकसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

त्यामुळे एकूण तीनशे दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी नाशिक शहरासाठी उपलब्ध होणार आहे. तीनशे दशलक्ष घनफूट पाणी जवळपास वीस दिवस नाशिककरांना पुरणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

darna dam
Nashik: कनिष्ठ, सहाय्यक अधिकाऱ्यांची ZP CEOनी घेतली परिक्षा; कामात बदल करून चांगले काम करण्याचे सूचना

दबावामुळेच कपात लांबणीवर : बडगुजर

एप्रिल महिन्यापासून आठ दिवसातून एकदा, तर जून महिन्यापासून पुढे आठ दिवसातून दोनदा असे पाणीकपातीचे नियोजन होते. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून धरणातील पाण्याची सद्यःस्थितीत उपलब्धता, धरणातील पाण्याची उंची व रोजचा पाणी वापर यासंदर्भातील सविस्तर आकडेवारी आयुक्त व जलसंपदा विभागाला सादर केली.

त्यानुसार ३१ ऑगष्ट व त्यापुढेही पुरेल इतके पाणी धरणांमध्ये असताना नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट टाकण्याची आवश्‍यकता नाही. तसे झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलनाच्या भीतीनेच पाणी कपात लांबविण्यात आल्याचा दावा शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला.

darna dam
Jal jeevan Mission : ॲपवर फोटो अपलोड न केल्याने प्रशासनाने रोखली जलजीवनची देयके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com