NMC Water Shortage : ग्रामीण भागातील पाणी टंचाईचा भार शहरावर पडण्याची शक्यता!

water shortage
water shortageesakal

Nashik News : ग्रामीण भागामध्ये पाणीटंचाईची समस्या बिकट होत असल्याने त्याचा परिणाम शहराच्या लोकसंख्येत वाढ होण्यावर दिसून येत आहे.

लोकसंख्येच्या वाढत्या टक्क्यांमुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून रोजच्या पाणीपुरवठ्यात वाढ करावी लागणार आहे. (water shortage If there is an increase in water supply there is possibility of water shortage in city nashik news)

पाणीपुरवठ्यात वाढ झाल्यास शहरातदेखील पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. नाशिक शहराला गंगापूर, दारणा व मुकणे या तीन धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

गंगापूर धरणातून जवळपास १५ दशलक्ष घनफूट पाणी उपसा केले जाते, तर दारणा धरणातून सद्यःस्थितीत एक दशलक्ष घनफूट पाणी उपसले जात आहे. धरणातून चार ते पाच दशलक्ष घनफूट पाणी उपसा करून शहरात जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी स्वच्छ करून जलकुंभाच्या माध्यमातून घरोघरी पोचविले जाते.

राज्य शासनाला महापालिकेने सादर केलेल्या कृती आराखड्यामध्ये एप्रिल महिन्यात आठ दिवसातून एकदा, तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दर आठवड्याला दोनदा पाणी कपातीचे नियोजन केले आहे. परंतु, धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने महापालिकेने अद्यापपर्यंत कपात केलेली नाही.

पुढील ९३ दिवस म्हणजे ३१ ऑगस्टपर्यंत कुठलीही पाणीकपात न करता नाशिक शहराला पुरेल इतके पाणी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

water shortage
Nashik Water Shortage : पंचवटीच्या अनेक भागात अघोषित पाणीकपात; नागरिक त्रस्त

परंतु ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके जाणू लागल्याने शाळा नियमितपणे सुरू होत नाही, तोपर्यंत शहरी भागात वास्तव्य करण्याकडे नागरिकांचा कल आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा भार नाशिक शहरावर येऊन पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. लोकसंख्येचा टक्का वाढल्यास पाणीटंचाई निर्माण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तर धरणातून अतिरिक्त उपसा

गंगापूर धरणामध्ये सद्यःस्थितीत २६१५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील जवळपास १३३५ दशलक्ष घनफूट पाणी पुढील ९३ दिवस वापरावे लागणार आहे. मुकणे धरणात दोन हजार ९७१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. दारणा धरणात २७१५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे.

महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहराला १९. ५ दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा केला जातो. वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांना पाणीटंचाई जाणवेल. त्यातून महापालिका प्रशासनावर दबाव वाढल्यास अतिरिक्त पाणी उपसा करावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

water shortage
Nashik Water Cut : काळजी नाही, मात्र पाणी जपून वापरण्याची गरज!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com