
Nashik : येवल्यात 38 गाव पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा चार दिवस बंद
येवला (जि. नाशिक) : तालुक्यातील ५७ गावे व योजनांची तहान भागविणाऱ्या ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून सुरू असलेला पाणीपुरवठा चार दिवस बंद राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा योजना समितीने दिली आहे. (Latest Marathi News)
हेही वाचा: नाशिक : स्वाइन फ्लू, डेंगीच्या रुग्णात वाढ
३८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरळीतपणे कार्यान्वित असून लाभधारक गावांना नियमित सुरळीत स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा सुरु आहे. सध्यास्थितीत पालखेड कालव्याला सोडण्यात आलेले ओव्हरफ्लोचे पाणी आवर्तनातून ३८ गावे योजनेच्या साठवण तलावात पाणी घेणे सुरु आहे. हेर पाणी ओव्हरफ्लोचे असल्याने मातीमिश्रित आहे. त्याअनुषंगाने ३८ गावे योजनेचे बाभूळगाव येथील जलशुद्धीकरण केंद्र अंतर्गत सिएलफ व
फिल्टर बेड या पाणी शुद्धीकरण यंत्रणेमधून शुद्धीकरण करुन देखील पाणी पुर्णपणे स्वच्छ होत नाही. काही प्रमाणात माती मिश्रीत असल्याने २२ ते २५ जुलै असे चार दिवस पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे. पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेकडे ४ दिवस पाणी मागणी करु नये. माती मिश्रीत पाणी निवळताच २५ जुलैनंतर नियमितपणे पाणी पुरवठा सुरळीत सुरु करण्यात येईल अशी माहितीही देण्यात आली आहे.
हेही वाचा: नाशिक : खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास; वाहनधारक, पालक त्रस्त
Web Title: Water Supply Of 38 Village Water Supply Scheme In Yevla Has Been Stopped For Four Days
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..