esakal | आम्ही उजळ माथ्याने समोर येऊ- भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal

आम्ही उजळ माथ्याने समोर येऊ- भुजबळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक: ‘आम्ही तुरुंगात असताना कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना खाली पाहावे लागेल, याचे दुःख होते. तुरुंगात असताना भुजबळांना तुरुंगातून सोडा, या मागणीसाठी हजारो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. असंख्य लोकांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत,’ असे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली. तसेच लोकशाही आहे, खुशाल उच्च न्यायालयात जावे, आम्ही अधिक उजळ माथ्याने समोर येऊ, असा टोला त्यांनी विरोधकांना मारला.

हेही वाचा: पिंपळगाव बाजार समितीत बांगलादेशी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लूट!

‘‘नाशिकला आले काय अथवा कुठेही गेले काय, काय झालं? माध्यमांमध्ये किती महत्त्व मिळाले?,’’ असे प्रश्‍न उपस्थित करत भुजबळ यांनी ‘मेरे खिलाफ होनेवाली बातों को मैं अक्सर खामोशी से सुनता हूँ, जबाब देने का हक मैंने वक्त को दे रखा है’ अशा शब्दात विरोधकांवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र सदन कथित गैरव्यवहारप्रकरणी भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ व इतरांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर आज छगन भुजबळ हे नाशिकमध्ये आले.

भुजबळ म्हणाले...

आमच्यावर सर्वांचे प्रेम. तुरुंगातून बाहेर आल्यावर विधानसभा लढलो. आज जसे हार पडतायत, तसे प्रहार पडले आहेत. सध्या राजकारणातील लोकांची सहनशक्ती कमी होत चालली आहे. आता लोक हुशार झाले आहेत. जास्त काळ आपण लोकांना मूर्ख बनवू शकत नाही, हे सिद्ध झाले. तुम्ही सरळ वागलात की ‘तुमचा भुजबळ करू‘ हा वाक्प्रचार झाला होता, आता तो बदलावा लागेल.

loading image
go to top